मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

भारतातील पहिल्या STD Call ला आज 62 वर्षं पूर्ण, यामागचा इतिहास नेमका काय?

भारतातील पहिल्या STD Call ला आज 62 वर्षं पूर्ण, यामागचा इतिहास नेमका काय?

संग्रहित

संग्रहित

मोबाइल सेवा ही एसटीडीच्या दृष्टीने खूप सोईची आहे, पण एसटीडीचं योगदानही मोठं राहिलंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

एक काळ होता जेव्हा एक फोन करण्यासाठी STD PCO बूथसमोर लांब रांगेत तासनतास उभं राहावं लागायचं. आपल्या जवळच्या लोकांची विचारपूस करण्यासाठी किती तरी दिवस वाट पाहावी लागायची, गावात एकच फोन असायचा, त्यामुळे आपला नंबर कधी येईल, अशी परिस्थिती असायची. पण मोबाईल फोनच्या येण्याने ही परिस्थिती बदलली. एसटीडी इतिहासजमा झाले आणि आपण मोबाइल युजर झालो. मोबाइल सेवा ही एसटीडीच्या दृष्टीने खूप सोईची आहे, पण एसटीडीचं योगदानही मोठं राहिलंय. भारतात आजच्याच दिवशी 25 नोव्हेंबर 1960 ला पहिल्यांदा एसटीडी सेवा सुरू झाली होती. जाणून घेऊयात एसटीडीबद्दल काही खास गोष्टी. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

STD चा प्रवास कसा सुरू झाला होता?

STDचा फूल फॉर्म सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग आहे. ऑपरेटरच्या मदतीशिवाय टेलिफोन युजरला ट्रंक कॉलची सुविधा देणं,असा त्याचा अर्थ होतो. याआधी ट्रंक कॉल वापरला जायचा. ज्यामध्ये ऑपरेटरला फोन करावा लागायचा आणि नंतर तो ऑपरेटर आपल्याला ज्याच्याशी बोलायचंय, त्याला कनेक्ट करायचा.

19व्या शतकात, दूरसंचार सेवांनी ऑटोमॅटिक सिस्टम डेव्हलप केली, ती प्रत्येक टेलिफोनवरील डायल वापरून ग्राहकांना जोडायची. 1940 च्या दशकात, यूएस आणि कॅनडामध्ये डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग टेक्नॉलॉजी आणि मेथडचा शोध लावला गेला. यामुळे टेलिफोन ग्राहकांना ऑपरेटरशिवाय दूरवर कॉल डायल करणं शक्य झालं. यूकेमध्ये, एसटीडीची सुरुवात 5 डिसेंबर 1958 रोजी झाली होती, पण ती प्रक्रिया 1979 पर्यंत पूर्ण झाली नव्हती.

यूकेमध्ये राणी एलिझाबेथ ब्रिस्टलमध्ये असताना त्यांनी 5 डिसेंबर 1958 रोजी एसटीडी वापरून सर्वांत दूर  एडिनबर्गमध्ये थेट कॉल डायल केला होता. 8 मार्च 1963 रोजी या टेक्नॉलॉजीचा विस्तार झाला. नंतर लंडनमधील ग्राहक आंतरराष्ट्रीय डायरेक्ट डायलिंग वापरून थेट पॅरिसला कॉल डायल करू शकत होते.

याच दरम्यान, भारतातही एसटीडी सेवा सुरू झाली होती. 25 नोव्हेंबर 1960 रोजी पहिल्यांदा एसटीडी सेवा सुरू झाली होती. एसटीडी सेवेअंतर्गत कानपूर ते लखनऊदरम्यान पहिला कॉल करण्यात आला होता. नंतर देशातील प्रमुख शहरं या सेवेशी जोडली गेली होती.

हेही वाचा - बारामतीच्या प्राध्यापकाची मोठी झेप, जगातील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या संशोधन यादीत मिळाले स्थान

STD सेवा कशी काम करायची?

एसटीडी सर्व्हिसद्वारे कॉल करण्यासाठी शहरांपासून खेड्यापर्यंत एसटीडी कोड देण्यात आले होते. या कोडसह युजरचा टेलिफोन नंबर डायल केला जायचा. नवी दिल्लीचा कोड 011, उत्तर प्रदेशचा कोड 0120 आणि हरियाणाचा कोड 0124 होता. या STD कोडसह पूर्ण नंबर10 अंकी होता. एसटीडी बूथ आणि नंतर घरांमध्ये टेलिफोन डिरेक्टरीसह एसटीडी कोड बुक मिळत असे.

STD सेवा संपण्याच्या मार्गावर कशी पोहोचली?

मोबाईल फोन आल्याने एसटीडी सेवेला उतरती कळा लागली. जसजसा मोबाईलचा वापर वाढला, तसतसा एसटीडीचा वापर कमी झाला आणि आज क्वचितच एसटीडी बूथ दिसतात. एका अहवालानुसार, 2008 मध्ये देशात जवळपास 50 लाख एसटीडी बूथ होते, ते एका वर्षात (2009) 45 लाख झाले आणि नंतरच्या 6 वर्षांत त्यांची संख्या फक्त 6 लाख उरली होती.

2018 मध्ये, भारतीय रेल्वेने स्थानकांवर पीसीओ बूथची अनिवार्यता रद्द केली. ज्या दुकानांमध्ये आधी एसटीडी बूथ असायचे आता तिथे मोबाईल फोन, सिमकार्ड, चार्जर दिसतात. आधी लोक आपल्या जवळच्या लोकांशी बोलण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहायचे, ते लोक आता बेडवर पडून तासनतास बोलतात. अशाप्रकारे फोन आल्यानंतर एसटीडीची सेवा कमी झाली.

First published:

Tags: History, Phone