मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

बारामतीच्या प्राध्यापकाची मोठी झेप, जगातील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या संशोधन यादीत मिळाले स्थान

बारामतीच्या प्राध्यापकाची मोठी झेप, जगातील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या संशोधन यादीत मिळाले स्थान

अमेरिकेतील 'या' विद्यापीठाच्या यादीत बारामतीकर...

अमेरिकेतील 'या' विद्यापीठाच्या यादीत बारामतीकर...

डॉ. रमेश देवकाते यांनी पदार्थविज्ञानात पीएच. डी. मिळवली आहे. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पुणे, 21 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या मेहनतीने जागतिक स्तरावर मराठी मातीचं नाव मोठं केलंय. यानंतर आता बारामती येथील पदार्थविज्ञान विषयाचे डॉ. रमेश देवकाते यांचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाने आघाडीच्या संशोधकांच्या यादी नुकतीच जाहीर केली. त्यात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. रमेश देवकाते यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरवर्षी, स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली जाते. विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात डॉ. रमेश देवकाते यांना यावर्षीच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले आहे. डॉ. देवकाते हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

डॉ. रमेश देवकाते कोण -

डॉ. रमेश देवकाते यांनी पदार्थविज्ञानात पीएच. डी. मिळवली आहे. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांना संशोधनातील 15 वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्यांनी सौर ऊर्जा, सुपरकॅपॅसिटर, बॅटरी, व वॉटर स्प्लिटींग इत्यादी बाबींवर संशोधन केले आहे.

यादी कोणत्या आधारावर तयार करण्यात येते -

स्टॅनफर्ड विद्यापीठातील अभ्यासकांकडून जगभरातील संशोधकांच्या संशोधन कार्याचा सांख्यिकीय अभ्यास केला जातो. त्यात कोम्पॉसिट इंडिकेटर काढला जातो आणि मग यानंतर त्यावरुन ही यादी तयार केली जाते.

दरम्यान, डॉ. देवकाते यांनी आजवर जे संशोधन केले, त्या भरीव कामगिरीमुळे त्यांची 2019 मध्ये भारत सरकारच्या भास्करा अँडन्हान्स्ड सोलर एनर्जी (BASE) फेलोशीप प्रोग्रॅममध्ये निवड झाली होती. या ) फेलोशीप प्रोग्रॅममध्ये देशभरातून फक्त सहा जणांची निवड झाली होती. त्यात त्यांचा समावेश होता.

43 लाखांचा मिळाला निधी -

या फेलोशीपच्या माध्यमातून त्यांनी मिसूरी युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेकनॉलॉजी (रोला, अमेरिका) येथे पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांना भारत सरकार व विद्यापीठ स्तरावर संशोधन प्रकल्पांसाठी 43 लाखांचा निधी मिळाला आहे. यावर्षी सायन्स अँड इंजिनीरिंग रिसर्च इंजिनीरिंग बोर्ड (SERB) यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या टीचर्स असोसिएटशिप फॉर रिसर्च एक्सलन्स (TARE) या फेलोशीपसाठीही त्यांची निवड झाली आहे. या माध्यमातून ते बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगलोर या ठिकाणी बॅटरी साठी लागणाऱ्या पदार्थावर ते तीन वर्षे संशोधन करणार आहेत.

First published:

Tags: Baramati, Research, United States of America