मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Okhi90 16 इंची व्हील असणारी देशातील पहिली Electric Scooter, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

Okhi90 16 इंची व्हील असणारी देशातील पहिली Electric Scooter, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

ओकिनावा ही कंपनी लवकरच Okhi90 ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करणार आहे. 16 इंची चाकं असलेली ती भारतातली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असेल.

ओकिनावा ही कंपनी लवकरच Okhi90 ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करणार आहे. 16 इंची चाकं असलेली ती भारतातली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असेल.

ओकिनावा ही कंपनी लवकरच Okhi90 ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करणार आहे. 16 इंची चाकं असलेली ती भारतातली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असेल.

    नवी दिल्ली, 22 मार्च : जवळच्या अंतरावर ये-जा करण्यासाठी अनेकांना दुचाकी लागते. पेट्रोलच्या किमतीत वाढ होत असल्याने पेट्रोलची दुचाकी परवडत नाही. आता नवं तंत्रज्ञान विकसित होत असल्याने विविध इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात उपलब्ध होत आहेत. ओकिनावा ही कंपनी लवकरच Okhi90 ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करणार आहे. 16 इंची चाकं असलेली ती भारतातली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असेल.

    ओकिनावा कंपनीने यंदा आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केली. आता लवकरच कंपनी Okhi90 ही दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात आणणार आहे. Okhi90 या इलेक्ट्रिक स्कूटरचं टेस्टिंग अर्थात चाचणी नुकतीच झाली. त्यामध्ये या स्कूटरची काही खास वैशिष्ट्यं समोर आली आहेत.

    हे वाचा - Tata ची नवी Car लाँच, केवळ 21000 रुपयांत बुक करता येणार Tata Altroz DCA

    आधुनिक तंत्रज्ञान -

    Okhi90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ABS अथवा CBS ब्रेकिंग सिस्टीम मिळू शकते.

    150-180km ची ड्रायव्हिंग रेंज -

    ओकिनावाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्वाधिक वेग 90kmph असेल. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 150 से 180 किलोमीटर अंतर धावू शकेल. त्याचबरोबर या स्कूलटरमध्ये सिंगल लीथियम आयन बॅटरी असेल. ती डिस्चार्ज झाल्यानंतर काढून टाकून बदलतासुद्धा येऊ शकेल.

    याशिवाय या स्कूटरला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या आणि पुढच्या बाजूला ड्युअल स्प्रिंग शॉकरसुद्धा असतील. त्याचबरोबर या स्कूटरसोबत ई-सिम मिळणार आहे. त्याच्या साह्याने युजर्स स्मार्टफोनच्या अ‍ॅप्लिकेशन्ससह त्याचा उपयोग करू शकतात. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, व्हेइकल अलर्ट, जिओ फेन्सिंग, ई-कॉल, डायग्नॉस्टिक आणि राइड बिहेवियर अ‍ॅनालिसिस यांसारखी अनेक फीचर्स यात आहेत.

    किंमत -

    Okhi90 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.20 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. या स्कूटरची स्पर्धा एथर 450x, ओला S1 pro आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरशी होऊ शकते.

    हे वाचा - Electric Scooter खरेदी करायची आहे? या 3 स्कूटर ठरतील चांगला पर्याय

    16 इंची चाकं -

    ओकिनावाची Okhi90 ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात असलेल्या इतर सगळ्या स्कूटरपेक्षा वेगळी आहे.

    Okhi90 इलेक्ट्रिक स्कूटर 16 इंची अ‍ॅलॉय व्हील्स असलेली भारतातली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल. बाकीच्या स्कूटर्सना जास्तीत जास्त 8 इंची चाकं देण्यात आली आहेत.

    ओकिनावाच्या Okhi90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बाकीच्या स्कूटर्सप्रमाणे हब मोटर मागच्या बाजूला नसेल. Okhi90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये गाडीची मोटर मध्यभागी असेल. ती बेल्टच्या माध्यमातून मागच्या चाकाला ऊर्जा देईल.

    या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3800 वॅट्सची मोटर असेल. त्यामुळे ही स्कूटर अधिक शक्तिशाली असेल. याशिवाय Okhi90 इलेक्ट्रिक स्कूटरच्या हँडलवर ग्राफिक्स डिझाइनसुद्धा असेल.

    First published:
    top videos

      Tags: Electric vehicles, Scooter ride