मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /India’s Safest Car: 'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित फोर व्हीलर

India’s Safest Car: 'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित फोर व्हीलर

India’s Safest Car

India’s Safest Car

कारची (India’s Safest Car) खरेदी करताना स्वतःसोबतच कुटुंबाच्या सुरक्षेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमिवर जाणून घेऊया भारतातील सर्वात सुरक्षित फोर व्हीलरसंदर्भात...

  नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर: नवीन कार (new car) खरेदी करताना अनेकदा कारचा लूक, रंग आणि डिझाईन्सकडे ग्राहक लक्ष देतात. याशिवाय कारमध्ये असलेल्या म्युझिक सिस्टिमसह इतर सुविधांची माहिती घेतली जाते. पण कारची खरेदी करताना स्वतःसोबतच कुटुंबाच्या सुरक्षेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून कारमध्ये प्रवास हा सुरक्षित होऊ शकतो. आज तुम्हाला अशाच काही सुरक्षित कारबद्दल ( safest car ) माहिती देणार आहोत ज्यामध्ये प्रवास हा केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या मुलांसाठीदेखील सुरक्षित (safest car for child) होईल.

  तुम्ही कार खरेदी करता पण ती किती सुरक्षित आहे, याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पुढच्या सीटवर असाल किंवा तुमची मुलं मागच्या सीटवर असतील, प्रत्येकाची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच कार खरेदी करताना ती कितीपत सुरक्षित आहे, याची खात्री करावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या रस्ते अपघातात होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. आज अशाच काही कारबद्दल जाणून घेऊया ज्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अव्वल आहेत.

  टाटा पंच

  ग्लोबल एनसीएपीने (global ncap) टाटा मोटर्सची नवीन मिनी एसयूव्ही टाटा पंच (Tata PUNCH) ही कार मागच्या सीटवर बसलेल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य कार मानली आहे. एनसीएपीने क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग दिले आहे. या कारमध्ये दोन एअरबॅग आहेत. 18 महिन्यांचे बाळ, 3 वर्षांची मुले यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार योग्य मानली जाते. तर, प्रौढ व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

  महिंद्रा एक्सयूव्ही 300

  महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ही महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ( Mahindra & Mahindra ) कंपनीची कार आहे. ही कार ग्लोबल एनसीएपीने 64 किलोमीटर प्रतितास वेगाने घेण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे. या कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये दोन एअरबॅग आहेत. प्रौढ व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

  टाटा टिगोर ईव्ही

  टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) ही टाटा मोटर्सची कार आहे. ग्लोबल एनसीएपीने मुलांच्या सुरक्षिततेनुसार या इलेक्ट्रिक कारला 4 स्टार दिले आहेत. या कारमध्ये दोन एअरबॅग आहेत. अपघात झाल्यानंतर ही कार डोकं आणि छातीचं संरक्षण करण्यास सक्षम आहे. 18 महिन्याचं बाळ आणि 3 वर्षांची मुलं यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा ही कार चांगली मानली जाते.

  महिंद्रा थार

  महिंद्रा अँड महिंद्राची थार ( Mahindra Thar ) ही कारदेखील ग्लोबल एनसीएपीनुसार मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम आहे. मागील सीटवर बसलेल्या मुलांच्या छाती आणि डोक्याच्या सुरक्षेचा विचार केल्यास या कारला याबाबतीत 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. थार कारमध्ये दोन एअरबॅग आहेत. ही गाडी 9 किलो ते 25 किलो वजनाच्या मुलांच्या सुरक्षेसाठी चांगली असल्याचे सांगितले जाते.

  कार खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. कारची किंमत व इतर सुविधा याकडे जसे लक्ष दिले जाते, तसे सुरक्षिततेबाबत देणे गरजेचे आहे. कार उत्पादक कंपन्याही आता सुरक्षित कार ( safest car ) तयार करण्यावर भर देत आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Auto expo, Car, Car crash, Lifestyle, Safety