नवी दिल्ली, 9 जुलै : बाइक हा तरुण-तरुणींचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आपल्या आवडत्या बाइकने लाँग ड्राइव्ह करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मुलांप्रमाणे मुलीही फक्त स्कुटीपुरत्या मर्यादित न राहता बाइक चालवताना दिसतात. यापैकीच कायम चर्चेत असलेली बाइक म्हणजे रॉयल एनफील्ड (Royal Enfield). त्या बाइकच्या आकर्षक डिझाईनमुळे, हेवी वेटमुळे आणि त्यावर बसल्यावर येणाऱ्या हटके लूकमुळे ही बाइक अनेक तरूणांची ड्रीम बाइक असते.
रॉयल एनफील्ड ही बाइक उत्पादक कंपनी जगभरात तिच्या हेवी बाईक्ससाठी प्रसिध्द आहे. ही बाइक तिच्या लाँग स्ट्रोक इंजिन आणि लो एंड टॉर्कसाठी स्पोर्ट्स बाइक म्हणून नव्हे तर क्रुझर बाइक म्हणून अधिक उपयुक्त मानली जाते. तुम्हीही ही बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खालील 5 गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण अनेकदा तुम्हाला असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे, चुकीच्या तुलनेमुळे, लोकांच्या वेगवेगळ्या सल्ल्यांमुळे तुम्ही पसंत न पडलेली गाडी घरी घेऊन येता आणि नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागतो. म्हणून कोणतीही बाइक खरेदी करण्यापूर्वी त्या बाइकची संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.
रॉयल एनफील्ड बाइक खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या -
अतिशय मॉडर्न बाइक -
रॉयल एनफील्ड ही इतर जुन्या बाइकपेक्षा मॉडर्न मानली जाते. नवीन सुरक्षा मानकांनुसार या बाइकमध्ये आता अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. तसंच अधिक सुरक्षेसाठी बाइकच्या फ्रंट आणि रियर टायर्समध्ये ABS सिस्टमही बसवलं आहे. BS6 ही नवीन इंधन उत्सर्जन नियमावली आल्यानंतर बाइकमधील कार्बोरेटरच्या ऐवजी इंधन इंजेक्शन टेक्निकचा वापर केला जात आहे.
हाय स्पीडसाठी ही बाइक नाही -
तुम्ही या बाइकबद्दल अधिक माहिती घेतली असेल, माहित असेल, की ही बाइक हायस्पीडच्या ड्राईव्हसाठी उपयुक्त नाही. पण ही लाँग ड्राइव्हसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. ही बाइक जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करू शकत नाही. तसं पाहिलं तर, ही गाडी फक्त ताशी 70 ते 80 किलोमीटरच्या वेगाने प्रवास करण्यासाठी उपयुक्त आहे.
गाडी खराब झाल्यास -
गाडी खराब झाल्यास मेकॅनिकची गरज नाही. तुम्ही स्वतः ती दुरुस्त करू शकता. कारण रॉयल एनफील्ड आपल्याला बाइकसोबत टूलकिट पण देते. ज्याच्या मदतीने तुम्ही त्यात बिघाड झाल्यास ती नीट करू शकता.
वजनदार बाइक -
इतर बाइक्सच्या तुलनेत रॉयल एनफील्ड सर्वात वजनदार बाइक आहे. यांपैकी सर्वात हलकी बाइक म्हणजे बुलेट 350, जी 180 किलोग्रॅम वजनाची आहे.
अधिक किंमत -
रॉयल एनफील्ड ही सतत डिमांडमध्ये असलेली बाइक आहे. जिच्या किंमती कधी कमी होत नाहीत किंवा यावर कोणत्याही ऑफर्स किंवा डिस्काउंट दिला जात नाही. या बाइकचा वेटिंग पिरियडही 2 महिन्यांपर्यत चालतो. सेगमेंटमध्ये मिळणाऱ्या बाइकपेक्षाही रॉयल एनफील्ड महाग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Royal enfield 350