मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Mahindra XUV300 खरेदी करण्याची संधी; इतक्या EMI वर घरी आणता येईल कार

Mahindra XUV300 खरेदी करण्याची संधी; इतक्या EMI वर घरी आणता येईल कार

महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ही देशातील सुरक्षित आणि मध्यम आकारातील एक्सयूव्ही आहे. या कारला जागतिक एनसीएपी (NCAP) कार क्रॅश रेटिंग्जमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. ही कार अत्यंत वाजवी ईएमआयमध्ये (EMI) खरेदी करू शकता.

महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ही देशातील सुरक्षित आणि मध्यम आकारातील एक्सयूव्ही आहे. या कारला जागतिक एनसीएपी (NCAP) कार क्रॅश रेटिंग्जमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. ही कार अत्यंत वाजवी ईएमआयमध्ये (EMI) खरेदी करू शकता.

महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ही देशातील सुरक्षित आणि मध्यम आकारातील एक्सयूव्ही आहे. या कारला जागतिक एनसीएपी (NCAP) कार क्रॅश रेटिंग्जमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. ही कार अत्यंत वाजवी ईएमआयमध्ये (EMI) खरेदी करू शकता.

    नवी दिल्ली, 6 जुलै : जर तुम्ही लांबच्या प्रवासाचं नियोजन करत असाल आणि हा प्रवास तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कारमधून करायचा असेल, तसंच तो पर्यावरणपूरक असावा असं वाटत असेल तर लग्झरी लूक असेलली दमदार कार खरेदी करण्याची संधी आहे. महिंद्राची एक्सयूव्ही 300 हे मॉडेल यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे तुम्ही ही कार अत्यंत वाजवी ईएमआयमध्ये (EMI) खरेदी करू शकता.

    महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ही देशातील सुरक्षित आणि मध्यम आकारातील एक्सयूव्ही आहे. या कारला जागतिक एनसीएपी (NCAP) कार क्रॅश रेटिंग्जमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. जर तुम्ही ही एक्सयुव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ 12,908 रुपयांच्या ईएमआयमध्ये (EMI) ही कार तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. या XUV मध्ये हायटेक फीचर्ससह पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमची गरज आणि पसंतीनुसार यापैकी एक पर्याय निवडू शकता.

    Mahindra XUV300 सनरुफ -

    महिंद्रा कंपनीने ही एक्सयूव्ही एखाद्या लग्झरी कारप्रमाणे (Luxury Car) डिझाईन केली आहे. कंपनीने लग्झरी कारमध्ये असणारं इलेक्ट्रिक सनरुफ (Sun Roof) फीचर या एक्सयूव्हीमध्ये दिलं आहे. यामुळे तुम्ही पर्यावरणाशी कनेक्ट राहू शकता. तसंच एक्सयूव्ही 300 मध्ये फ्रंट पार्किंग सेन्सरही देण्यात आला आहे.

    (वाचा - 13 MP कॅमेरा असलेलं जगातलं पहिलं स्मार्टवॉच झालं लाँच; 5 हजार रुपयांचा डिस्काउंट)

    Mahindra XUV300 फीचर्स -

    कंपनीने या एक्सयूव्हीमध्ये पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो, फ्रंट अँटिब्रेकिंग सिस्टीम, ड्रायव्हर आणि पॅसेंजर प्रवासी बॅग्ज दिल्या आहेत. यासोबतच या मॉडेलमध्ये फ्रंट अलॉय व्हील आणि मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील मिळेल.

    इंजिन -

    कंपनीने ही एक्सयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायांसह सादर केली आहे. यात कंपनीने 1497 CC चं डिझेल इंजिन आणि 1197 CC पेट्रोल इंजिन उपलब्ध करुन दिलं आहे. तसंच या इंजिनसह मॅन्युअली ट्रान्समिशनही मिळेल. मायलेजचा (Mileage) विचार केला, तर ही एक्सयूव्ही 17 ते 20 kmpl मायलेज देते.

    (वाचा - Driving दरम्यान हँड्स फ्री डिव्हाइसच्या माध्यमातून फोनवर बोलणं पडेल महागात)

    महिंद्रा एक्सयूव्ही 300 ची किंमत -

    या एक्सयूव्हीच्या बेस वेरिएंटची पुण्यातील एक्स-शोरुम किंमत 7,95,963 रुपये आहे. तसंच टॉप वेरिएंटची पुण्यातील एक्स-शोरुम किंमत 11,46,735 रुपये आहे. जर तुम्ही ही एक्सयुव्ही ईएमआय ऑप्शनमध्ये खरेदी करत असाल, तर यासाठी सुरुवातीचा ईएमआय 12,098 रुपये असेल.

    First published:
    top videos

      Tags: Car, Tech Mahindra