मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

कार घ्यायची असेल तर ही संधी सोडू नका! Hyundai च्या अनेक कार्सवर मोठी सूट

कार घ्यायची असेल तर ही संधी सोडू नका! Hyundai च्या अनेक कार्सवर मोठी सूट

(Image: Manav Sinha/News18.com)

(Image: Manav Sinha/News18.com)

ह्युंदाई मोटर्सच्या काही कारवर 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Hyundai Motors तुम्हाला एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटसह रोख सवलत देत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 9 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात अनेकांनी आपल्या घरी नवीन कार आणली असेल. मात्र ज्यांना सणासुदीच्या काळात कार खरेदी करता आली नाही त्यांच्यासाठी गूडन्यूज आहे. सणासुदीच्या हंगामानंतरही तुम्ही कार खरेदीवर सूट मिळवू शकता. Hyundai Motors त्यांच्या निवडक मॉडेल्सवर उत्तम डील देत आहे. ह्युंदाई मोटर्सच्या काही कारवर 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Hyundai Motors तुम्हाला एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटसह रोख सवलत देत आहे.

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro)

Hyundai Motors आपली छोटी कार Hyundai Santro वर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 25,000 रुपयांचा रोख लाभ, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट नफा यांचा समावेश आहे. ही ऑफर फक्त पेट्रोल व्हेरिएंट खरेदीवर दिली जात आहे. Hyundai Santro च्या CNG कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

ह्युंडाई ग्रँड आय 10 निओस (Hyundai Grand i10 Nios)

Hyundai ची सर्वात लोकप्रिय कार Hyundai Grand i10 Nios वर 35,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. पण ही सूट 1.0 पेट्रोल व्हेरियंटवर दिली जात आहे. Hyundai Grand i10 Nios च्या 1.2L पेट्रोल आणि 1.2L डिझेल व्हेरियंटवर फक्त 20,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. CNG प्रकारावर कोणतीही सूट नाही. या सवलतीशिवाय Hyundai Grand i10 Nios च्या सर्व प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

Ola E-Scooter: फॅक्ट्रीमध्ये कशी बनते ओला ई-स्कूटर, पाहा VIDEO

ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura)

Hyundai Aura च्या CNG प्रकारावर कोणतीही सूट दिली जात नाही. तर 1.0 लिटर पेट्रोल व्हेरिएंटवर 35,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.2 डिझेल व्हर्जनवर ही सूट 10,000 रुपये आहे. या कॅश डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्हाला या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळू शकते.

Zero Down Payment मध्ये इथे मिळतेय Maruti Swift, पाहा फीचर्स आणि ऑफर

ह्युंदाई i20 (Hyundai i20)

तुम्हाला Hyundai i20 कार घ्यायची असेल तर तुम्हाला त्यावर 25,000 रुपयांची सूट मिळेल. पण ही सूट 1.0 लीटर पेट्रोल व्हर्जनवर दिली जात आहे. पेट्रोल iMT आणि डिझेल MT प्रकारांवर एक्सचेंज बोनस म्हणून 10,000 रुपये आणि कॉर्पोरेट सूट म्हणून 5000 रुपयांची सवलत मिळेल.

ह्युंदाई कोना (Hyundai Kona)

Hyundai Kona या कारवर देखील चांगली सूट देण्यात येत आहे. Hyundai Kona इलेक्ट्रिक SUV वर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

First published:

Tags: Car, Hyundai