मुंबई, 22 जून : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Electric Vehicle) वापरल्या जाणार्या लिथियम-आयन बॅटरी (Lithium-ion batteries) हा त्यातील सर्वात महाग भाग आहे. साधारणपणे ही बॅटरी 5-7 वर्षे सहज टिकते. बहुतेक कंपन्या बॅटरी पॅकवर जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत वॉरंटी देतात. यानंतर ते बदलणे आवश्यक आहे, कारण इलेक्ट्रिक वाहनाची रेंज आणि पॉवर ही बॅटरीच्या क्षमतेवर अवलंबून असते. जर तुमच्याकडेही इलेक्ट्रिक कार, स्कूटर किंवा बाईक असेल आणि तुम्हाला त्याची बॅटरी जास्त काळ सुरक्षित ठेवायची असेल तर तुम्हाला यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला EVमध्ये चांगली रेंज मिळेल आणि बॅटरीही सुरक्षित राहील. वाहन नेहमी थंड ठिकाणी पार्क करा इलेक्ट्रिक वाहन पार्किंग करताना उच्च तापमानाचा संपर्क टाळावा. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्वयंचलित तापमान नियंत्रण प्रणाली असते, जी सामान्य तापमान कमी ठेवण्याचे काम करते. इग्निशन चालू असताना आणि वाहन बॅटरी वापरत असतानाच ही यंत्रणा काम करू शकते. जर तापमान जास्त असेल आणि तापमान यंत्रणा काम करत नसेल अशा ठिकाणी वाहन पार्क केली असेल तर आग लागण्याचा धोका वाढतो. जलद चार्जिंग वापरणे टाळा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जलद चार्जिंग टेक्नोलॉजी खूप महत्त्वाचे आहे. जलद चार्जिंग EV बॅटरी त्याच्या मानक चार्जिंग वेळेपेक्षा खूप वेगाने चार्ज करते. ही प्रणाली EV मालकांसाठी सोयीस्कर आहे, परंतु बॅटरीच्या आयुष्यासाठी ते चांगले नाही. एका वर्षासाठी स्टँडर्ड चार्जिंग वापरल्याने एका वर्षाच्या जलद चार्जिंगपेक्षा 10 टक्के जास्त बॅटरी लाइफ मिळेल. खिशाला लागणार कात्री? घरगुती गॅसपासून मालमत्तेपर्यंत येत्या 10 दिवसात बदलणार ‘हे’ 5 नियम बॅटरी सतत वापरत राहा इलेक्ट्रिक वाहने बराच वेळ पार्क केल्यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकते. EV बॅटरीच्या दीर्घ आयुष्यासाठी बॅटरी चार्ज ठेवणे नेहमीच महत्त्वाचे असते. हे मोबाईल फोनच्या बॅटरीसारखे आहे. नेहमी 25 ते 75 टक्के बॅटरी चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही चार दिवसांपेक्षा जास्त काळ बॅटरी वापरत नसल्यास MCB बंद करा. वारंवार चार्जिंग टाळा इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी पूर्ण चार्ज ठेवणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु यासाठी बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागते. बॅटरीच्या वारंवार चार्जिंगमुळे तिची बॅटरी लाईफ खराब होऊ शकते. जरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी अधिक रेंज देते, तरीही ती बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगली नसते. पॅनकार्डच्या मदतीने TDS Status चेक करा; पगारातून कापलेले पैसे रिफंड मिळण्यास होईल मदत राइड केल्यानंतर लगेच बॅटरी चार्ज करू नका वाहनातून घरी परतल्यानंतर लगेच बॅटरी चार्ज करणे टाळा. EV चालू असताना बॅटरी वापरली जात असताना, ती जास्त गरम होते. राइड केल्यानंतर लगेच चार्ज केल्याने बॅटरी थंड होत नाही. त्यामुळे, बॅटरी चार्ज करण्यापूर्वी ती थंड होण्यासाठी किमान 30 मिनिटे द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.