मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /अँड्रॉइड फोन आणि टॅब्लेटवर स्क्रीन रेकॉर्डिंग कसं करायचं? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

अँड्रॉइड फोन आणि टॅब्लेटवर स्क्रीन रेकॉर्डिंग कसं करायचं? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

file photo

file photo

अँड्रॉइड डिव्हाइसवर स्क्रीनशॉट घेणं खूप सोपं आहे. पण काही वेळा काही महत्त्वाच्या कामांसाठी व्हिडिओजच्या काही भागाची गरज भासू शकते

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

    नवी दिल्ली, 12 डिसेंबर : अँड्रॉइड 12 डिव्हाइसेसवर स्क्रीन रेकॉर्ड करणं खूप सोपं आहे. अँड्रॉइड 11 लाँच होण्यापूर्वी गुगल डेव्हलपर्सनी या फीचरवर काम सुरू केलं होतं. अँड्रॉइड 11 आणि त्यानंतरच्या व्हर्जन्समध्ये एक इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डर देण्यात आलेला आहे. काही सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर स्क्रीन रेकॉर्ड करू शकता.

    अँड्रॉइड डिव्हाइसवर स्क्रीनशॉट घेणं खूप सोपं आहे. पण काही वेळा काही महत्त्वाच्या कामांसाठी व्हिडिओजच्या काही भागाची गरज भासू शकते. अशा वेळी स्क्रीन रेकॉर्डर उपयुक्त ठरतो. जुन्या अँड्रॉइड फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डचा ऑप्शन नव्हता. काही विशिष्ट ब्रँड्समध्येच हा ऑप्शन होता; पण तो वापरायला खूप कठीण होता. मात्र, गुगलने या फीचरवर काम केलं आणि आपली ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या व्हर्जन्समध्ये हा ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे.

    अँड्रॉइड 12 डिव्हाइसवर स्क्रीन रेकॉर्डिंग कसं कराल?

    अँड्रॉइड 12 डिव्हाइसवर स्क्रीन रेकॉर्ड करणं खूप सोपं आहे. अँड्रॉइड 11 नंतर आलेल्या व्हर्जन्समध्ये इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डर देण्यात आला आहे. काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर स्क्रीन रेकॉर्ड करू शकता.

    स्टेप 1 - नोटिफिकेशन पॅनेल दोन वेळा खालच्या बाजूस स्वाइप केल्यावर तुमच्या डिव्हाइसमधलं क्विक सेंटिग पॅनेल ओपन करा.

    स्टेप 2 - या पॅनेलवरचा स्क्रीन रेकॉर्डर हा ऑप्शन सिलेक्ट करा. स्क्रीन रेकॉर्डर हा ऑप्शन दिसत नसेल तर आयकॉन्सच्या शेवटी तुम्हाला + हे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.

    स्टेप 3 - आता स्क्रीन रेकॉर्डर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि खालच्या बाजूस ड्रॅग करा किंवा क्विक सेटिंग्ज मेन्यूत अन्य आयकॉन्समध्ये याचा समावेश करा.

    स्टेप 4 - एकदा स्क्रीन रेकॉर्डर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे का आणि स्क्रीनवर टच क्लिक दाखवायचं आहे का, असं विचारलं जाईल.

    स्टेप 5 - तुम्ही गरजेनुसार ऑप्शन निवडू शकता आणि स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी `Start Recording` हा ऑप्शन निवडू शकता.

    स्टेप 6 - जेव्हा तुमच्या फोनवर रेकॉर्डिंग सुरू असेल, तेव्हा स्क्रीनच्या वरच्या बाजूला लाल रंगाचं रेकॉर्डिंग चिन्ह किंवा सूचना दिसेल. जेव्हा तुम्हाला रेकॉर्डिंग बंद करायचं असेल, तेव्हा तुम्ही या लाल रंगावर किंवा आयकॉनवर टॅप करू शकता.

    या अ‍ॅप्सच्या मदतीनेही करू शकता स्क्रीन रेकॉर्ड

    तुमचा स्मार्टफोन इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डिंगला सपोर्ट करत नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. कारण काही अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही स्क्रीन रेकॉर्ड करू शकता.

    हेही वाचा - Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत?

    एझेड स्क्रीन रेकॉर्डर

    एझेड स्क्रीन रेकॉर्डर हे वेळेची मर्यादा किंवा वॉटरमार्क नसलंले आणि वापरण्यास सोपं असलेलं रेकॉर्डिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये व्हिडिओ एडिट करण्याचा ऑप्शनही दिला गेला आहे. या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही स्क्रीन क्रॉप करू शकता. ऑडिओ बदलू शकता आणि सेक्शन्स GIFsमध्ये रूपांतरित करू शकता.

    एक्स रेकॉर्डर

    इनशॉटने डेव्हलप केलेल्या एक्स रेकॉर्डर अ‍ॅपचे 100 दशलक्षपेक्षा अधिक डाउनलोड्स झाले आहेत. हे अत्यंत लोकप्रिय एडिटिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. या अ‍ॅपचा वापर तुम्ही रेकॉर्डिंग शेअर करण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी किंवा स्क्रीन रेकॉर्डसाठी करू शकता. या अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एडिटिंग करण्यासाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

    गुगल प्ले गेम्स

    गुगल प्ले गेम्सच्या मदतीने तुम्ही अँड्रॉइड डिव्हाइसेसवर स्क्रीन रेकॉर्ड करू शकता. स्क्रीन रेकॉर्डिंगसोबत तुम्ही तुमचा व्हिडिओ यू-ट्यूबवरही अपलोड करू शकता.

    First published:

    Tags: Smartphones, Tech news, Technology