मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /लोकप्रिय Honda City आली नव्या दमात; प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फिचर्स

लोकप्रिय Honda City आली नव्या दमात; प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फिचर्स

 ग्राहकांना  प्लेटफॉर्म 'होंडा फ्रॉम होम' (Honda from Home) च्या माध्यमातूनही कार बूक करता येणार आहे.

ग्राहकांना प्लेटफॉर्म 'होंडा फ्रॉम होम' (Honda from Home) च्या माध्यमातूनही कार बूक करता येणार आहे.

ग्राहकांना प्लेटफॉर्म 'होंडा फ्रॉम होम' (Honda from Home) च्या माध्यमातूनही कार बूक करता येणार आहे.

    नवी दिल्ली, 26 जून : भारतात प्रीमियम कार निर्माता कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) ने आपल्या बहुप्रतिक्षित ऑल न्यू 5th जनरेशन होंडा सिटी (Honda City) चे  प्री-लॉन्च बुकिंग सुरू केले आहे. ग्राहकांना ऑनलाइन सेल्स प्लेटफॉर्म 'होंडा फ्रॉम होम' (Honda from Home) च्या माध्यमातूनही कार बूक करता येणार आहे. 5th जनरेशनचा अवतार हा जुलै महिन्यात लाँच होणार आहे.

    होंडा कार्स इंडियाचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि व्यवस्थापक, मार्केटिंग आणि सेल्सचे राजेश गोयल यांनी सांगितलं की, 'होंडा सिटीने आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन होंडा सिटीच्या प्रत्येक जनरेशनमध्ये नवनवीन बदले केले. नवीन कारची विक्री ही पुढील महिन्यात सुरू होणार आहे.'

    All New Honda City ही आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात लांब आणि रूंद कार आहे.  5th जनरेशन मॉडेलमध्ये VTC प्रणालीसह ऑल-न्यू 1.5 लिटर i-VTEC DOHC इंजिन दिले आहे. त्याचबरोबर डिझेलमध्ये रिफांडइ 1.5 लिटर i-DTEC इंजन दिले आहे. हे दोन्ही इंजिन BS-6 उत्सर्जन मानकांसह आहे.

    अरे देवा! म्हशीच्या दुधाचं कर्ज उतरवण्यासाठी कॉन्स्टेबलनं मागितली सुट्टी

    ऑल न्यू होंडा सिटी अलेक्सा रिमोट क्षमतेसह भारतातली पहिली कनेक्टेड कार आहे. ही कार टेलीमॅटिक्स कंट्रोल यूनिट (TCU) सोबत जोडलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर, या कारने आंतरराष्ट्रीय स्तरावर एन-कॅम्प 5-स्टार रेंटिंग मिळाले आहे.

    भारतात पहिल्यांदाच होंडामध्ये सुपर हाय फॉर्मेबिलिटी 980 एमपीए ग्रेड स्टीलचा वापर करण्यात आला आहे. सोबकच अल्ट्रा हाई टिम्सम स्टीलचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही कार आणखी कमी वजन आणि मजबूत तयार केली आहे.

    फिचर्स

    या कारमध्ये अनेक दमदार फिचर्स दिले आहे. यात फुल एलईडी हेडलॅप्स, z-शेप रॅम्प-अरालउंड एलईडी टेल लॅम्प, 17.7 सेमी HD फूल कलर टीएफटी मीटर दिले आहे. यासोबतच  जी-मीटर, लेन वॉच कॅमेरा, एजाइल हेडलिंग असिस्ट (AHA) दिले आहे.

    नव्या होंडा सिटीमध्ये  20.3 सेमीचा टचस्क्रीन डिस्प्ले ऑडिओ, अँड्रॉईड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले आणि वेबलिंकसह स्मार्टफोन कनेक्टिविटी, वन-टच इलेक्ट्रिक सनरूफ दिले आहे.

    संपादन - सचिन साळवे

    First published:

    Tags: Honda