रीवा, 26 जून : सुट्टी घ्यायची असेल तर अर्ज लिहिताना आपण कारण लिहितो. या अर्जामध्ये कोणी बरं नाही म्हणून सुट्टी हवी म्हणतं तर कुणी घरी जायचं म्हणून पण एका कॉन्स्टेबलनं दिलेलं कारण वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. होय हे खरंच आहे. कॉन्स्टेबल कुलदीप तोमर यांनी सुट्टी घेण्यासाठी दिलेलं कारण आणि त्यांचं पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय बनलं आहे.
या अर्ज वजा पत्रात कुलदीप तोमर यांनी म्हटलं आहे की, 'आईची तब्येत अजूनही बरी झाली नाही. याशिवाय घरात एक म्हैसही आहे. या म्हशीनं नुकतंच एका रेडकुला जन्म दिला आहे. या म्हशीच्या सेवेसाठीही मला रजा हवी' असल्याचं तोमर यांनी अर्जात नमूद केलं आहे.
हे वाचा-'या' राज्यामध्ये दोन आठवड्यांसाठी वाढला लॉकडाऊन, लागू होणार कर्फ्यू
म्हशीचे दूध पिऊन मी भरतीसाठीच्या शर्यतीची तयारी करायचो. त्या म्हशीला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. आज मी त्या म्हशीमुळे पोलिसात भरती होऊ शकलो. चांगल्या आणि वाईट काळात म्हशींनी मला साथ दिली आहे. अशा परिस्थितीत मी म्हशीची काळजी घेणेही माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मला ही सुट्टी हवी असल्याचं तोमर यांनी म्हटलं आहे.
हे वाचा-अलर्ट! SBI, PNB पाठोपाठ या सरकारी बँकेने दिला सायबर हल्ल्याचा इशारा
आजारी म्हशीची काळजी घेण्यासाठी कुलदीप तोमर यांनी सुट्टी मागितली आहे. म्हशीच्या दुधाचं कर्ज फेडण्यासाठी मला ही सुट्टी हवी असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. एसएएफच्या 9 व्या बटालियनमध्ये तैनात कॉन्स्टेबल कुलदीप तोमर यांची आई गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. त्यामुळे तोमर आधीच 10 दिवस रजेवर जाऊन आले होते आणि त्यानंतर पुन्हा रजा हवी असल्याचा त्यांनी अर्ज केला.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Madhya pradesh news, Madhya pradesh police, Viral post