Home /News /auto-and-tech /

Splendor+ XTEC: नव्या हीरो स्प्लेंडर+ चे हे 5 फीचर्स आहेत खास; स्पेशल बाईकची वाचा सर्व खासियत

Splendor+ XTEC: नव्या हीरो स्प्लेंडर+ चे हे 5 फीचर्स आहेत खास; स्पेशल बाईकची वाचा सर्व खासियत

Splendor+ XTEC किंमत ₹ 72,900 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की, Splendor + XTEC ला पाच वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. अलिकडेच अपडेट केलेल्या या बाईकच्या खास 5 वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

    नवी दिल्ली, 22 मे : Hero MotoCorp ने काही दिवसांपूर्वी नवीन आणि अपडेट व्हर्जन असलेली Splendor + XTEC भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या नवीन बाईकमध्ये अनेक नवीन आणि अपडेटेड फीचर्स जोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, याला बाईकला सर्व प्रमुख अपडेट्स मिळाले आहेत, जे आधी Pleasure XTEC स्कूटरला देण्यात आले होते. Splendor+ XTEC किंमत ₹ 72,900 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की, Splendor + XTEC ला पाच वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. अलिकडेच अपडेट केलेल्या या बाईकच्या खास 5 वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत. ब्लूटूथ : नवीन स्प्लेंडर+ हे XTEC ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सेगमेंट-फर्स्ट फूल डिजिटल मीटरसह येते. हा डिजिटल डिस्प्ले अगदी उपयोगी आणि वापरकर्त्याला -अनुकूल कार्यांसह सादर केला आहे, जसे की इनकमिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट, नवीन एसएमएस सूचना, RTMI (रिअल टाइम मायलेज इंडिकेटर) आणि कमी इंधन निर्देशकासह दोन ट्रिप मीटर. यूएसबी चार्जिंग : विविध स्कूटरमध्ये हे वैशिष्ट्य कॉमन आहे. हे आतापर्यंत बाइकवर फारसे दिसले नव्हते. त्यामुळे गाडी चालवताना मोबाईल चार्जिंगची सोय आहे. लांबच्या प्रवासात मोबाईल चार्ज करण्यासाठी याचा उपयोग करता येईल. एलईडी लाइटिंग : नवीन स्प्लेंडर एलईडी हाय-इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (HIPL) आणि विशेष ग्राफिक्ससह येते. तसेच, नवीन LEDs बाईकच्या पुढील भागाचा लूक वाढवतात आणि हे घटक स्प्लेंडरला स्पोर्टी दिसणारी बाईक बनवण्यात योगदान देतात. हे वाचा -  Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी i3S टेक्नॉलॉजी: Idle Stop-Start System साठी हीरोचा हा पेटंट शब्द आहे आणि पॉवरट्रेनमधून उत्तम इंधन कार्यक्षमता प्राप्त करण्यास ते अनुकूल आहे. हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या पॉवरट्रेन: नवीन स्प्लेंडर 97.2cc BS-VI इंजिनद्वारे येथ आहे. जी 7,000 rpm वर 7.9 PS पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक 4-स्पीड ट्रान्समिशनसह येते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bike riding, Technology

    पुढील बातम्या