Home /News /auto-and-tech /

Google चं Task Mate App पाहिलं का? घरबसल्या पैसे कमविण्याची आहे चांगली संधी

Google चं Task Mate App पाहिलं का? घरबसल्या पैसे कमविण्याची आहे चांगली संधी

यासाठी गुगल तुम्हाला काही टास्क देईल. ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. विशेष म्हणजे यामधील टास्क खूपच सोपे असणार आहेत.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : गुगल (Google) सध्या भारतात आपल्या Tasks Mate App चं टेस्टिंग करत आहे. या Appच्या माध्यमातून युजर्स काही सोपे टास्क पूर्ण करून पैसे कमवू शकतात. यामध्ये जगभरातील विविध व्यावसायिकांनी पोस्ट केलेले विविध टास्क असणार आहेत. या टास्कमध्ये रेस्टॉरंटचे फोटो काढणं, सर्व्हेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, इंग्लिशमधून कोणत्याही भाषेत भाषांतर करणं यांसारख्या टास्कचा समावेश आहे. सध्या हे App बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून  रेफ्रल कोडद्वारे निवडक टेस्टरना हे App वापरता येत आहे. या Tasks Mate App वर तुम्ही टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्थानिक चलनामध्ये मोबदला देखील मिळणार आहे. 9to5Google कडून Reddit ला मिळालेल्या माहितीनुसार, यामधील टास्क खूपच सोपे असणार आहेत. यामध्ये इनडोअर किंवा आउटडोअर अशा दोन प्रकारच्या कॅटेगरीमधून एकाची निवड करू शकता. businesses around the world हे त्याचे सोर्स असणार आहेत. बसून करण्याच्या टास्कमध्ये ट्रान्सक्रिप्शन, काही वाक्य रेकॉर्ड करून पाठवणं या बरोबरच इंग्लिशमधून स्थानिक भाषेत भाषांतर देखील करायचा पर्याय उपलब्ध आहेत. हे ही वाचा-मोदी सरकारचा मोठा झटका; ब्लॉक केले Dating and Flirt Chinese Mobile app यामध्ये फिल्ड टास्कमध्ये तुम्हाला दुकानाच्या समोरच्या बाजूचा फोटो घेऊन गुगल मॅपमध्ये पत्ता योग्य करण्यासाठी मदत करायची आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या लेव्हलवर आहात आणि किती टास्क पूर्ण केले आहेत याची देखील माहिती मिळणार आहे. तसेच किती बरोबर आहेत आणि त्याची टक्केवारी किती आहे याची देखील माहिती मिळणार आहे. यानंतर या टास्कच्या माध्यमातून तुम्ही किती पैसे मिळवले आहेत आणि किती पेंडिंग आहेत याची देखील माहिती मिळणार आहे. महत्त्वाचे आणि सर्वांत सोपी गोष्ट म्हणजे युजर्स कुठूनही हे टास्क पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने घेऊ शकता कॅश टास्क जिंकल्यानंतर युझर्स आपली रक्कम रुपयांमध्ये घेऊ शकतात. त्यामुळे भारतीय नागरिकांनी हा टास्क जिंकल्यानंतर बक्षिसाची रक्कम रुपयांमध्ये मिळेल. यासाठी युजर्सला ई-वॉलेट आणि  अकाउंट नंबर पेमेंट पार्टनर बरोबर रजिस्टर करावा लागणार आहे. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही रक्कम युजर्स कॅशच्या रूपात काढून घेऊ शकतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या