मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी गुगल आणणार अपडेट, युजर्सच्या तक्रारींनंतर घेतला मोठा निर्णय

इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी गुगल आणणार अपडेट, युजर्सच्या तक्रारींनंतर घेतला मोठा निर्णय

इंटरनेट स्पीड

इंटरनेट स्पीड

गुगलने गेल्या महिन्यात नेस्ट वाय-फाय प्रो मेश राउटर लाँच केला होता. ते वेगवान वाय-फाय 6A च्या सपोर्टसह येतं. त्यात 5.4Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड देण्याची क्षमता आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : सध्याच्या काळात इंटरनेटचा स्पीड खूप महत्त्वाचा आहे. बरेच जण ऑनलाइन काम करतात, त्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी असेल तर कामात व्यत्यय येतो. याशिवाय आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहण्यासाठीही इंटरनेटचा स्पीड चांगला असावा लागतो. फोनचं इंटरनेट फास्ट नसेल तर अनेक जण घरी वाय-फाय सेवा घेतात, जेणेकरून कामात अडथळा येऊ नये. पण अनेकदा वाय-फायचा स्पीड स्लो असल्याच्या तक्रारीही येतात.

काही युजर्सनी कमी इंटरनेट स्पीडची तक्रार केल्यानंतर गुगल पुढील आठवड्याच्या सुरुवातीला नवीन नेस्ट वाय-फाय प्रो साठी सॉफ्टवेअर अपडेट आणणार आहे. एका रिपोर्टनुसार, गुगल नेस्ट वाय-फायच्या प्रॉडक्ट प्रमुखांनी सांगितलं की, कंपनी सध्या Nest Wi-Fi Pro राउटरवर कमी इंटरनेट स्पीड अनुभवत असलेल्या युजर्सच्या रिपोर्ट्सची चौकशी करत आहे आणि त्यांच्या टीम्स ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत. या संदर्भात ‘इंडिया टीव्ही’ने वृत्त दिलंय.

गुगलने गेल्या महिन्यात नेस्ट वाय-फाय प्रो मेश राउटर लाँच केला होता. ते वेगवान वाय-फाय 6A च्या सपोर्टसह येतं. ते 5.4Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड देण्यास सक्षम आहे. हे नेटवर्क कंजेशन कमी करण्यात मदत करण्यासाठी 6GHz बँड जोडते आणि अडथळे कमी करण्यासाठी नेटवर्क ऑटोमॅटिकली काम करतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी काही युजर्सनी गुगल नेस्ट फोरमवर 40Mbps ते 90Mbps पर्यंत कॅप्ड डाउनलोड आणि अपलोड स्पीडमुळे निर्माण झालेल्या समस्येबद्दल तक्रार केली होती. एका मीडिया रिपोर्टनुसार, युजर्सनी सांगितलं की त्यांच्या जुन्या नेस्ट वाय-फाय प्रो नव्या डिव्हाइसपेक्षा जास्त चांगलं प्रदर्शन करतंय. जुनं नेस्ट वाय-फाय प्रो फक्त वाय-फाय 5 ला सपोर्ट करते, पण तरीही ते नवीन डिव्हाइसपेक्षा चांगली स्पीड देत असल्याचं युजर्सचं म्हणणं होतं.

हे वाचा - 11 अब्ज वर्षं जुन्या सुपरनोव्हामुळे उलगडणार विश्वाचं रहस्य

नवीन राउटर विकत घेतलेल्या प्रत्येकाला ही अडचण नाही. ही समस्या प्रामुख्याने यूकेमधील युजर्सना प्रभावित करत असल्याचं समोर आलंय. ते युजर्स इथरनेट (पीपीपीओई) नेटवर्कवर पॉइंट-टू-पॉइंट प्रोटोकॉल वापरतात.

हे वाचा - या तगड्या स्मार्टफोनवर तब्बल 31,500 रुपयांपर्यंत मिळणार सूट, सोडू नका सुवर्णसंधी

रिपोर्ट्सनुसार, अनेक डिजिटल सबस्क्रायबर लाइन्स (डीएसएल) प्रोव्हायडर ही प्रणाली वापरतात. त्यासाठी युजर्सना त्यांच्या राउटरसाठी नाव आणि पासवर्डसह कॉन्फिगर करणं आवश्यक असतं. या समस्येचा परिणाम यूएस आणि युरोपच्या इतर भागांमध्ये तसंच फायबर ऑप्टिक असलेल्या युजर्सवर होत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या नव्या सेवेमुळे युजर्सना फायदा होऊ शकतो.

First published:

Tags: High speed internet, Internet, Internet use