जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 'या' तगड्या स्मार्टफोनवर तब्बल 31,500 रुपयांपर्यंत मिळणार सूट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी

'या' तगड्या स्मार्टफोनवर तब्बल 31,500 रुपयांपर्यंत मिळणार सूट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी

'या' तगड्या स्मार्टफोनवर तब्बल 31,500 रुपयांपर्यंत मिळणार सूट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी

'या' तगड्या स्मार्टफोनवर तब्बल 31,500 रुपयांपर्यंत मिळणार सूट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक धमाकेदार ऑफर आहे. ही ऑफर फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मने आणली आहे. फ्लिपकार्टवरून Google Pixel 6a स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यावर मोठी सूट मिळत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 12 नोव्हेंबर: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक धमाकेदार ऑफर आहे. ही ऑफर फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मने आणली आहे. फ्लिपकार्टवरून Google Pixel 6a स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यावर मोठी सूट मिळत आहे. ‘डील ऑफ द डे’ ऑफर अंतर्गत हा फोन खरेदी करून युझर्स एकूण 31,500 रुपयांची बचत करू शकता. फ्लिपकार्ट युझर्सना 43,999 रुपयांचा फोन केवळ 12,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची अनोखी संधी देत आहे. अगदी स्वस्तात हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. त्यावर कोणत्या ऑफर्स आणि काय डिस्काउंट आहे, ते जाणून घेऊ या. युझर्स 13,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Google Pixel 6a स्मार्टफोन केवळ 30,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. तुम्हाला हा फोन आणखी स्वस्त दरात खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे एक्स्चेंज ऑफरचा पर्याय आहे. फ्लिपकार्टच्या ऑफर अंतर्गत, तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्स्चेंज केल्यावर 18,500 रुपयांपर्यंतचा वेगळा फायदा मिळेल; मात्र हे तुमच्या जुन्या स्मार्टफोनचं मॉडेल आणि त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. तुम्ही पूर्ण लाभ घेऊ शकलात तर तुमची एकूण 31,500 रुपयांची बचत होईल आणि 43 हजारांचा फोन अवघ्या 12 हजार रुपयांत तुम्हाला मिळेल. Google Pixel 6a या फोनची स्पेसिफिकेशन्स- फ्लिपकार्टची ही ऑफर Google Pixel 6a या फोनच्या Charcoal 6GB+128GB या व्हॅरिएंटवर मिळत आहे. हा फोन 6.14 इंच फुल HD+ OLED डिस्प्लेसह येतो. त्याचं रिझॉल्युशन 2400×1080 पिक्सेल असून, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चं प्रोटेक्शन त्याला आहे. यामध्ये Google Tensor चिपसेटचा सपोर्ट देण्यात आलाय. हा स्मार्टफोन अँड्राइड 12वर चालतो. हेही वाचा: आता स्वस्तात खरेदी करा ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स, Amazonचा ‘स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल’ सुरु Google Pixel 6a या फोनटी कॅमेरा स्पेसिफिकेशन्स- फोटग्राफीसाठी यामध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झाल्यास युझर्सना यामध्ये 12.2MPचा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा मिळतो. याशिवाय यामध्ये व्हिडिओ कॉल व सेल्फीसाठी गुगलने 8MPचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा एक 5G स्मार्टफोन असून प्रॉक्सिमिटी सेन्सर, बेरोमीटर, अँम्बिअंट लाइट सेन्सर यांसारखी फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    बॅटरी व स्टोरेज- या फोनमध्ये 4410 mAh बॅटरी आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगसह येतो. युझर्सना यामध्ये पाच वर्षांपर्यंत पिक्सेल अपडेट मिळत राहील. एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हर ऑप्शनसह स्मार्टफोनची बॅटरी 72 तास टिकते. यामध्ये 6GB रॅम व 128GB चं इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात