मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

गुगल लवकरच दमदार स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता; सीक्रेट डिव्हाइसवर काम सुरू

गुगल लवकरच दमदार स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता; सीक्रेट डिव्हाइसवर काम सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आता गुगल लवकरच एक हाय एंड स्मार्टफोन लॉंच करू शकतं, अशी चर्चा आहे. पिक्सेल 7 सीरिज लॉंच करण्यापूर्वी या फोनच्या कोडनेमचा तपशील समोर आला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Kolhapur, India

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : बाजारात नावीन्यपूर्ण फीचर्स असलेले स्मार्टफोन सातत्यानं लॉंच होत असतात. ग्राहकांची मागणी आणि त्यांचा कल लक्षात घेऊन मोबाईल उत्पादक कंपन्या आपल्या स्मार्टफोनमधील फीचर्स अपडेट करत असतात. गेल्या काही वर्षांत इंटरनेट म्हणजेच गुगल असं समीकरण पाहायला मिळत आहे. गुगलची जीमेलसह वेगवेगळी अ‍ॅप्स वापरणाऱ्या युजर्सची संख्या मोठी आहे. गुगलचे स्मार्टफोन देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. गुगलने नुकतंच पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रो हे दोन नवीन स्मार्टफोन लॉंच केलं आहे. सध्या पिक्सेल सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन आहेत. मात्र, कंपनी लवकरच आणखी दोन नवीन स्मार्टफोन लॉंच करण्याची शक्यता आहे. या पैकी एक स्मार्टफोन पिक्सेल 7a असू शकतो. तर दुसरा फोन एक हाय एंड डिव्हाइस असू शकतं. या फोनची खास फीचर्स समोर आली आहेत. हा फोन पिक्सेल 7 सीरिजचा एक भाग असू शकतो, अशी चर्चा आहे. आज तकने या विषयीची माहिती दिली आहे.

गुगलने नुकतंच पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रो हे दोन नवे स्मार्टफोन लॉंच केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये युजर्सना दमदार फीचर मिळत आहेत. गुगल पिक्सेल 7 प्रो हा स्मार्टफोन या सीरिजमधला सर्वांत प्रीमिअम फोन आहे. पण आता गुगल लवकरच एक हाय एंड स्मार्टफोन लॉंच करू शकतं, अशी चर्चा आहे. पिक्सेल 7 सीरिज लॉंच करण्यापूर्वी या फोनच्या कोडनेमचा तपशील समोर आला आहे. हा फोन पिक्सेल 7 सीरिजचा एक भाग असू शकतो, असं बोललं जात आहे.

हे वाचा - WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी आता ब्लर करता येणार; कसं वापरता येईल हे फीचर

पिक्सेल 7 चा कोडनेम P10 (Panther) आणि प्रो व्हेरियंटचं कोडनेम C10 (Cheetah) असल्याचं दिसून आलं होतं. या कोडनेमचा तपशील अँड्रॉईड ओपन सोर्स प्रोजेक्टमधून मिळाला होता. काही रिपोर्ट्सनुसार, गुगलच्या नवीन हाय एंड स्मार्टफोनची साइज आणि डिझाईन पिक्सल 7 प्रोसारखी असू शकतं. परंतु, कंपनीने या डिव्हाइसच्या अनुषंगाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हे वाचा - ओला इलेक्ट्रिक कारबद्दल नवी माहिती समोर, कारला नसणार साइड मिरर

9to5Googleच्या रिपोर्टनुसार गुगल G10 कोडनेम असलेल्या दुसऱ्या एका डिस्प्लेसाठी सपोर्ट तयार करत आहे. G10 डिस्प्ले 120hzरिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. याचं स्क्रीन रिझोल्युशन 1440×3120 पिक्सल असेल. याचाच अर्थ या डिव्हाइसचा स्क्रीन पिक्सेल 7 प्रोपेक्षा अधिक चांगला असू शकतो. हा डिस्प्ले बीओई या चायनीज कंपनीने तयार केला आहे. G10 डिस्प्ले पुढील पिक्सेल डिव्हाइससाठी प्रोटोटाइप डिस्प्ले असू शकतो अथवा गुगलच्या पिक्सेल 7 सीरिजमध्ये एका नव्या डिव्हाइसचा समावेश होऊ शकतो. या स्मार्टफोनविषयी अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.

First published:

Tags: Google, Smartphones