मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ओला इलेक्ट्रिक कारबद्दल नवी माहिती समोर, कारला नसणार साइड मिरर

ओला इलेक्ट्रिक कारबद्दल नवी माहिती समोर, कारला नसणार साइड मिरर

ओला इलेक्ट्रिक

ओला इलेक्ट्रिक

इलेक्ट्रिक वाहन निर्माती ओला इलेक्ट्रिक कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारबद्दल अधिक माहिती दिली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सध्या वाहनांच्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती वेगाने होत आहे. अनेक मोठ्या वाहन निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक कार्स आणि स्कूटर बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. ओला कंपनीही त्यापैकीच एक आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माती ओला इलेक्ट्रिक कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारबद्दल अधिक माहिती दिली आहे. ही कार 2024 पर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार ही फोटोंमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्युचरिस्टिक स्टाइल थीम असलेली प्रीमिअम सेडान कार असेल. एका पातळ एलईडी पट्टीसारख्या डिटेलसह कारचं डिझाईन खूप क्लीन आहे. ही पट्टी पूर्ण कारमध्ये हेडलॅम्पपर्यंत देण्यात आली आहे. तिला एका एरोडायनॅमिक आकारात तयार केलं जाईल, जी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अधिक रेंज प्राप्त करण्यासाठी खूप महत्वाची आहे. या संदर्भात एबीपी लाईव्हने वृत्त दिलंय.

  कारची रेंज किती असेल?

  या कारच्या रेंजबद्दल माहिती देताना ओला इलेक्ट्रिकने असा दावा केलाय, की ही कार मोठ्या बॅटरी पॅकसह 500 किमीपर्यंत धावेल. तसंच ती चार सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-100 किमी प्रतितास वेग पकडेल. कारची ही गती खूपच जास्त आहे.

  हेही वाचा -  थंडीत तुमच्याप्रमाणंच Electric Car ही गारठते, बेस्ट परफॉर्मन्ससाठी घ्या 'ही' काळजी

  कारला साइड मिरर नसणार

  या कारच्या इतर डिझाईन डिटेल्सबद्दल सांगायचं झाल्यास रिअर व्ह्युसाठी दरवाजावर कोणताही आरसा म्हणजेच साइड मिरर मिळणार नाही. त्याच्या जागी कॅमेरे दिले जाणार आहेत, जे जास्त एअरोडायनॅमिक आहेत. या कारच्या इंटिरिअरमध्ये टू-स्पोक स्टियरिंग व्हीलदेखील मिळेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अँबियंट लायटिंगसारखी प्रीमिअम फीचर्सही असतील. याशिवाय कारमध्ये एक फूल ग्लास रूफ देण्यात येईल, असं म्हटलं जातंय.

  कंपनीचा प्लॅन काय?

  ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या उलट कंपनीची इलेक्ट्रिक कार ही प्रीमिअम इलेक्ट्रिक सेडान असेल. महत्त्वाचं म्हणजे सध्या या सेगमेंटमध्ये भारतात दुसरी कोणतीही इलेक्ट्रिक सेडान उपलब्ध नाही. सेगमेंटमध्ये सध्या बहुतांशी इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर्स आणि एसयूव्ही कार्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ओला ईव्ही या सेगमेंटवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठी एंट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने स्कूटर स्पेसच्या बाबतीतही असंच केलं होतं.

  कंपनी इतर कार्स आणण्याच्या तयारीत

  ओला इलेक्ट्रिक फक्त एक नाही तर अनेक कार आणेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही पहिली कार प्रीमिअम स्पेसमध्ये येईल. टीझरचा विचार करायचा झाला तर ही कार सेडान आणि क्रॉसओव्हरचं मिश्रण असू शकतं. शिवाय साध्या लेआऊटसह हिचं इंटिरिअर खूप फ्युचरिस्टिक आहे. या ईव्हीबद्दल आणखी माहिती मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

  First published:

  Tags: Car, Technology