जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / बाइकप्रेमींसाठी खूशखबर! लवकरच Royal Enfield च्या तीन नव्या बाइक्स येणार मार्केटमध्ये...

बाइकप्रेमींसाठी खूशखबर! लवकरच Royal Enfield च्या तीन नव्या बाइक्स येणार मार्केटमध्ये...

बाइकप्रेमींसाठी खूशखबर! लवकरच Royal Enfield च्या तीन नव्या बाइक्स येणार मार्केटमध्ये...

रॉयल एनफिल्डची ही बाइक टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आली.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : अनेकांना स्वतःची कार असावी असं वाटतं; पण काहीजणांना बाइकचं प्रचंड वेड असतं. खासकरून, तरुणांमध्ये बाइकचं वेड अधिक असतं. काही जण बाइकला जीवापाड जपतात. अशा बाइकप्रेमींसाठी रॉयल एनफिल्ड कंपनी नव्या बाइक्स मार्केटमध्ये आणत आहे. बाइकप्रेमींसाठी ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची असणार यात नवल नाही. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘इंडिया न्यूज’ने दिलं आहे. रॉयल एनफिल्ड ही बाइक्स बनवणारी भारतीय मल्टिनॅशनल कंपनी आहे. 1955 साली या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीच्या बाइक्स आजही सर्वांना भुरळ घालतात. या कंपनीच्या विविध बाइक्स मार्केटमध्ये आहेत. रॉयल एनफिल्डकडून आता तीन नव्या बाइक्स ग्राहकांसाठी येणार असल्याचं कळतंय. या बाइक्सची क्षमता 350 सीसी, 450 सीसी आणि 650 सीसी असणार आहे. यातल्या काही बाइक्स टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आल्या होत्या. कंपनी लवकरच या बाइक्स मार्केटमध्ये आणणार आहे. या बाइक्सबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ. हिमालयन 450 - बेस्ड नेकेड बाइक - रॉयल एनफिल्डची ही बाइक टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आली. त्यावेळी बाहेर आलेल्या फोटोजवरून असं दिसून येतंय, की यात हिमालयन 450सारख्या लिक्विड कूल्ड इंजिनाचा वापर केलाय. या बाइकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि सिंगल सीटची व्यवस्था आहे. यामुळे या बाइकच्या सीटची उंची ही हिमालयन 450च्या तुलनेत कमी असेल. जेव्हा ही बाइक मार्केटमध्ये येईल, तेव्हा तिची फीचर्स आणि किंमत हिमालयन 450 पेक्षा नक्कीच जास्त असेल. रॉयल एनफिल्ड बुलेट 350 -  या स्वरूपातली बाइक गेली अनेक वर्षं विक्रीस आहे. याच मॉडेलची सुधारित आवृत्ती मार्केटमध्ये येणार आहे. कंपनीतर्फे येणाऱ्या इतर बाइक्समध्ये ही एकमेव 350 सीसी क्षमतेची बाइक असेल. फक्त नव्या स्वरूपात यात J प्लॅटफॉर्म इंजिन असणार आहे. तसंच बाइकप्रेमींसाठी रॉयल एनफिल्डकडून ‘रायडर मॅनिया’ भरवला जातो. यंदा हा सोहळा 18-20 नोव्हेंबरमध्ये असणार आहे. याच सोहळ्यात नव्या 350 सीसीच्या या बाइकची घोषणा केली जाईल आणि ती विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हेही वाचा -  MG लाँच करणार देशातील सर्वात स्वस्त Electric Car, कमी किमतीत दमदार फीचर्स रॉयल एनफिल्ड सुपर मीटीओर 650 -  सुपर मीटीओर 650 लवकरच मार्केटमध्ये येण्याची अपेक्षा आहे. ही बाइक सध्याच्या मीटीओर 350 पेक्षा जास्त क्षमतेची असेल. सुपर मिटीओर 650 मध्ये फीट फॉरवर्ड पोजिशनची सोय आहे. तसंच अधिक गोलाकार फिरणारा हँडलबार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात