Home /News /news /

येत आहे BMW ix3 इलेक्ट्रिक एसयूव्ही,असा आहे लूक

येत आहे BMW ix3 इलेक्ट्रिक एसयूव्ही,असा आहे लूक

एकदा चार्ज केल्यावर ही गाडी 400 किमीचे अंतर पार करेल, असा दावा कंपनीने केला आहे.

    नवी दिल्ली, 12 जुलै : बीएमडब्ल्यू (BMW) ने  आपली नवीन इलेक्ट्रिक  बीएमडब्ल्यू आईएक्स3 एसयूव्ही (BMW iX3 EV SUV) चा टिझर रिलीज केला आहे. BMW iX3 ही गाडी पुढील आठवड्यात 14 जुलै रोजी लाँच करण्यात येणार आहे. BMW ची ही एसयुव्ही एक नवीन इलेक्ट्रिक गाडी असणार आहे आहे. त्यानंतर याच प्लॅटफॉर्मवर 2021 मध्ये BMW i4 आणि BMW iNEXT सारखे मॉडल लाँच होणार आहे.  2023 पर्यंत BMW ला एकूण 23 इलेक्ट्रिक गाड्या लाँच करायच्या आहे. ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये  70 kWh ची बॅटरी लावण्यात आली आहे. यात इलेक्ट्रिक मोटर 270 bhp ची पॉवर आणि 400 Nm चा टॉर्क जनरेट होईल. एकदा चार्ज केल्यावर ही गाडी 400 किमीचे अंतर पार करेल, असा दावा कंपनीने केला आहे. या एसयूव्हीमध्ये BMW ने नवीन बॅटरीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे  150 kWh फास्ट चार्जर्स अशी सुविधा यात मिळणार आहे. म्हणजे, अर्ध्या तासात 80 टक्के बॅटरी चार्ज होईल. BMW iX3 भारतात लाँच होणार की नाही, याबद्दल अजून अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु,  EQC, I-Pace आणि e-tron आधीच भारतात लाँच झाल्या आहे. त्यामुळे भारतात ही इलेक्ट्रि्क एसयूव्ही विकण्याची शक्यता आहे. ये लेका, कोल्हापुरात दोन गटात हातोडी-फावड्याने तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल या गाडीत नवी आकर्षित ग्रिल आणि ब्लू-क्रोम बॉर्डर्स दिले आहे.  एरोडायनेमिक बम्पर, ब्लू एसेंट्स सह साथ साइड-सिल्स आणि स्पेशल अलॉय व्हील्स दिले आहे. BMW iX3 चा सामना हा थेट मर्सिडीज EQC आणि ऑडी e-tron शी होणार आहे   iX3 या गाडीला X3 एसयूव्हीचा लूक असल्याचं दिसून येत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या