Home /News /auto-and-tech /

Elecric Scooters: देशात सर्वाधिक विकल्या जातात 'या' 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; भारतीयांना लावलंय वेड

Elecric Scooters: देशात सर्वाधिक विकल्या जातात 'या' 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; भारतीयांना लावलंय वेड

Elecric Scooters: देशात सर्वाधिक विकल्या जात आहेत या 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; भारतीयांना लावलंय वेड

Elecric Scooters: देशात सर्वाधिक विकल्या जात आहेत या 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; भारतीयांना लावलंय वेड

Top Elecric Scooters in India: अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा काही घटना घडल्या आहेत, परंतु तरीही भारतीय बाजारपेठेत त्यांची मागणी कायम आहे. या मे महिन्यात इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

    मुंबई, 19 जून : अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter) आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकीकडे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना थांबत नाहीयेत, मात्र तरीही भारतीय बाजारपेठेत त्यांची मागणी कायम आहे. विशेषत: या मे महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. ओला इलेक्ट्रिकने आता इलेक्ट्रीक स्कूटर विभागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एप्रिल 2022 प्रमाणे, मे मध्ये देखील ओलाने विक्रमी विक्री केली आहे. विशेष बाब म्हणजे 2-3 महिन्यांपूर्वी 'हिरो इलेक्ट्रिक' ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमधील नंबर-1 कंपनी टॉप-5 च्या शर्यतीतून बाहेर पडली. त्याच वेळी, प्युअर ईव्हीला त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला सर्वाधिक आगीचा फटका सहन करावा लागला. मे महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप इलेक्ट्रीक स्कूटर्स ( Top Selling Electric Scooters in India): 1. Ola S1 Pro- गेल्या महिन्यात, ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये वर्चस्व कायम राखले. कंपनीने मे 2022 मध्ये 9,225 युनिट्सची विक्री केली. कंपनीच्या Ola S1 Pro स्कूटरला सर्वाधिक मागणी होती. उत्कृष्ट कामगिरी आणि हायटेक तंत्रज्ञानामुळे ही स्कूटर लोकांची पहिली पसंती राहिली आहे. हेही वाचा: आता दिवसा कार चालवली तर आपोआप होणार चार्ज! Tesla, Kia पेक्षाही जास्त रेंज 2. Okinawa Praise Pro - सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ओकिनावा प्राइज प्रो होती. गेल्या महिन्यात कंपनीने 7,339 युनिट्सची विक्री केली. तर एक वर्षापूर्वी मे महिन्यात कंपनीने केवळ 684 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच प्राइज प्रोची विक्री वार्षिक आधारावर तब्बल 972.95 टक्के जास्त झाली. 3. Ather 450- टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत Ather 450 तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने त्यातील 3,667 युनिट्सची विक्री केली. गतवर्षी मे महिन्यात कंपनीने केवळ 75 युनिट्सची विक्री झाली होती. हेही वाचा: 'ही' नवी इलेक्ट्रॉनिक स्कूटर ठरतेय अनेकांची पहिली पसंत; काय आहे खास? 4. TVS iQube - टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत TVS iCube चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने त्यातील 2,637 युनिट्सची विक्री केली. कंपनीने या स्कूटरची विक्री फक्त निवडक शहरांमध्ये सुरू केली आहे. कंपनी लवकरच देशभरात आपली डीलरशिप सुरू करणार आहे. 5. Bajaj Chetak: सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत बजाज चेतक इलेक्ट्रिक पाचव्या क्रमांकावर होती. गेल्या महिन्यात कंपनीने 2,544 युनिट्सची विक्री केली होती. गतवर्षी मे महिन्यात कंपनीने केवळ 31 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच चेतक इलेक्ट्रिकच्या विक्रीत वार्षिक आधारावर 8,106.45 टक्के वाढ नोंदवली गेली.
    Published by:user_123
    First published:

    Tags: Electric vehicles

    पुढील बातम्या