जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / ...तर तुमचं Driving License लगेच करा अपडेट; अन्यथा होईल मोठं नुकसान, नवीन आदेश जारी

...तर तुमचं Driving License लगेच करा अपडेट; अन्यथा होईल मोठं नुकसान, नवीन आदेश जारी

...तर तुमचं Driving License लगेच करा अपडेट; अन्यथा होईल मोठं नुकसान, नवीन आदेश जारी

लायसन्स अपडेट न केल्यास तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपेल. परिवहन मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 मार्च : तुमच्याकडे 20 वर्ष जुनं अर्थात 2002 आधी बनवलेलं ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. 12 मार्च रोजी ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन अपडेट करणं आवश्यक आहे. लायसन्स अपडेट न केल्यास तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपेल. परिवहन मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या (Transport Ministry) सारथी पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील परवान्याची माहिती आणि अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात (Sarathi Portal Vehicle Related Services) आली आहे. सारथी पोर्टलद्वारे तुम्ही घरबसल्या ऑनलाइन लर्निंग लायसन्स, रिन्युअल, ड्युप्लीकेट आणि करेक्शनसंबंधी काम करू शकता. त्याशिवाय मंत्रालयाने सर्व आरटीओला (RTO) हस्तलिखित असलेल्या जुन्या ड्रायव्हिंग लायसन्सचा डेटा ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले आहेत. 12 मार्चपर्यंत सारखी पोर्टलवर बॅकलॉग एन्ट्रीची लिंक ओपन राहिल. त्यानंतर ही सुविधा बंद केली जाईल.

हे वाचा -  तुमच्या गाडीचा Insurance लगेच करा रिन्यू, एप्रिलपासून मोठ्या बदलाची शक्यता

आता ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया केवळ सारथी पोर्टलद्वारेच (Sarathi Portal) करावी लागणार आहे. यासाठी डेटा ऑनलाइन असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे डायरी हस्तालिखित लायसन्स आहे, त्यांनी सारथी पोर्टलवर नोंदणी करावी अशा सूचना विभागाकडून देण्यात आल्या आहेत. अन्यथा, अशा लायसन्सचं रिन्यूवल होणार नाही. तसंच लायसन्स डुप्लीकेटही काढता येणार नाही.

हे वाचा -  e-PAN Card : घरबसल्या केवळ 10 मिनिटांत अप्लाय करा ऑनलाइन पॅन कार्ड

2002 पूर्वी सर्व ड्रायव्हिंग लायसन्स ऑफलाइन तयार होत होते. त्यांचा डेटा ऑनलाइन नव्हता. आता 20 वर्ष कालावधीच्या लायसन्सच्या रिन्यूअलसाठी अर्ज येत आहेत. त्यामुळे ज्या लोकांच्या लायसन्सचा डेटा अद्यापही ऑनलाइन नाही, त्यांनी तो सारथी पोर्टलद्वारे अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात