नवी दिल्ली, 5 मार्च : बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी किंवा आयटी रिटर्न फाइल करण्यासाठी, तसंच इतरही अनेक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक ठरतं. जर तुम्हीही पॅन कार्ड बनवलं नसेल, तर केवळ 10 मिनिटांत घरबसल्या ऑनलाइन पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता.
कसं बनवाल ऑनलाइन पॅन कार्ड -
घरबसल्या ऑनलाइन पॅन कार्ड बनवण्यासाठी सर्वात आधी ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन 'Instant PAN through Aadhaar' वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर 'Get New PAN' निवडा. इथे आधार नंबर विचारला जाईल आणि रजिस्टर्ड नंबरवर एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा OTP वॅलिडेशननंतर e-PAN दिलं जाईल.
PAN Card ची आवश्यकता का असते?
आयटी रिटर्न फाइल करण्यासाठी
बँकेत खातं सुरू करण्यासाठी
गाडी खरेदी करण्यासाठी
टेलिफोन कनेक्शन
5 लाख रुपयांहून अधिक दागिने खरेदीसाठी
सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करताना 50000 रुपयांच्या अधिक ट्रान्झेक्शनसाठी
इन्शोसन्स प्रीमियमसाठी
फॉरेन एक्सचेंज, प्रॉपर्टी, लोन एफडी, कॅश डिपॉझिट
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटनुसार, एकदा जारी करण्यात आलेलं पॅन कार्ड कायमस्वरुपी वॅलिड असतं. पॅन कार्ड केवळ एकच असतं. एकाहून अधिक पॅन कार्ड बनवणं अवैध आहे. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आढळल्यास 10000 रुपये दंड भरावा लागेल.
मृत्यूनंतर PAN Card ची कुठे असते गरज?
बँक अकाउंटपासून ते डिमॅट अकाउंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स करण्यासाठी पॅन कार्ड अतिशय आवश्यक ठरतं. त्यासाठी ते सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत सर्व अकाउंट बंद होत नाहीत, तोपर्यंत पॅन कार्ड सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. ITR फाइल करताना हे तोपर्यंत ठेवणं गरजेचं आहे, जोपर्यंत आयटी डिपार्टमेंटची प्रोसेस पूर्ण होत नाही.
पॅन कार्ड सरेंडरआधी या गोष्टी लक्षात ठेवा -
Income Tax डिपार्टमेंटकडे हा अधिकार असतो, की ते चार वर्षांच्या असेसमेंटला पुन्हा ओपन करू शकतात. त्यामुळे मृत व्यक्तीचं कोणतंही टॅक्स रिफंड बाकी असेल, तर ते त्याच्या खात्यात जमा व्हावं. ज्यावेळी खातं बंद करण्याची आणि इन्कम टॅक्स रिटर्नसंबंधी सर्व कामं पूर्ण होतील त्यावेळी मृत व्यक्तीचं पॅन कार्ड इन्कम डिपार्टमेंटकडे सोपवता येतं. पॅन कार्ड सरेंडर करण्याआधी मृत व्यक्तीची सर्व बँक खाती दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर किंवा बंद करावीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.