जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / फेसबुकला चूक पडली महागात, अकाउंट लॉक केल्याने वकिलाने घडवली चांगलीच अद्दल

फेसबुकला चूक पडली महागात, अकाउंट लॉक केल्याने वकिलाने घडवली चांगलीच अद्दल

file photo

file photo

एका युजरचं अकाउंट लॉक करणं, हे फेसबुकला खूपच भारी पडले.

  • -MIN READ Trending Desk International
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 19 जून : तुमचं फेसबुक अकाउंट फेसबुक कंपनीकडून लॉक करण्यात आलं, तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही फेसबुककडे याबाबत तक्रार कराल. पण फेसबुकनं तुमचं लॉक केलेलं अकाउंट सुरू करण्याबाबत असमर्थता दाखवली, तर तुम्ही कदाचित नवीन अकाउंट तयार करण्याचा पर्याय स्वीकाराल. परंतु, एका व्यक्तीनं त्याचं फेसबुक अकाउंट लॉक करण्यात आल्यानंतर फेसबुकवर थेट न्यायालयात खटला भरला. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. फेसबुकचे काही नियम आहेत, व या नियमांत एखाद्या यूजरचं अकाउंट लॉक करणंदेखील समाविष्ट आहे. पण एका युजरचं अकाउंट लॉक करणं, हे फेसबुकला खूपच भारी पडले. अमेरिकेतील एका वकिलाचं अकाउंट फेसबुक कंपनीनं लॉक केलं. त्यानंतर फेसबुककडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संबंधित वकिलानं फेसबुक कंपनीवर न्यायालयात खटला दाखल केला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ऑगस्ट 2022 मध्ये दाखल केलेल्या या खटल्याचा नुकताच निकाल लागला आहे. संबंधित वकिलानं फेसबुकच्या विरोधातील खटला जिंकलाय. न्यायालयानं फेसबुकला 50 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 41 लाख रुपये संबंधित व्यक्तीला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिलेत. नेमका प्रकार काय? फॉक्स 5 अटलंटाच्या रिपोर्टनुसार, जेसन क्रॉफर्ड यांनी कोणतेही कारण नसताना त्यांचे फेसबुक अकाउंट लॉक केल्याबद्दल फेसबुक कंपनीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. फेसबुकने जेसन यांना त्यांचे फेसबुक अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी मदत केली नाही, म्हणून ते न्यायालयात गेले. सुरुवातीला जेसन यांनी त्यांचे फेसबुक अकाउंट अनलॉक करण्यासाठी फेसबुकशी कॉन्टॅक्ट केला. परंतु, कंपनीनं कोणतेही उत्तर दिलं नाही, व त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी थेट न्यायालयाची पायरी चढली व फेसबुकवर खटला भरला, व हा खटला जिंकत फेसबुकला अद्दल घडवली. दरम्यान, फेसबुकनं एखाद्या व्यक्तीचं अकाउंट लॉक केल्यानंतर, ते अनलॉक करण्यासाठी संबंधित व्यक्तीला फेसबुकशी संपर्क साधणं खूप कठीण आहे. यामुळे युजर्सना त्रासाला सामोरं जावं लागतं. कारण फेसबुक अकाउंटशी संबंधित बहुतांश तक्रारी करण्यासाठी तुम्ही फक्त फेसबुक प्रोफाईलवर जाऊ शकता. पण अकाउंट लॉक झाल्यानंतर युजरकडे तो पर्यायही शिल्लक राहत नाही. त्यामुळेच अमेरिकेतील वकिलाने त्याचं अकाउंट लॉक केल्यानंतर फेसबुकवर खटला भरला, व तो जिंकत कंपनीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या खटल्यानंतर तरी फेसबुक त्यांच्याशी संपर्क करण्याची प्रक्रिया सोपी करेल का, हे लवकरच कळेल. पण सध्यातरी अमेरिकेतील या खटल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात