मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: 30 हजारांत फोर्ड! सांगलीकराने बनवली 'जुगाड Ford', रिक्षाप्रमाणे हँडल मारुन होते स्टार्ट

VIDEO: 30 हजारांत फोर्ड! सांगलीकराने बनवली 'जुगाड Ford', रिक्षाप्रमाणे हँडल मारुन होते स्टार्ट

सांगलीच्या (Sangli Jugaad Mini Ford) आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे.अवघ्या 30 हजार रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचं इंजन असा जुगाड करत 1930 सालाच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे.

सांगली, 14 जानेवारी: सांगलीच्या (Sangli Jugaad Mini Ford) आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे.अवघ्या 30 हजार रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचं इंजन असा जुगाड करत 1930 सालाच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे. सातवी पास असणाऱ्या अशोक आवटी या मॅकेनिकल कारागिराने ही ओल्ड मॉडेल जुगाड गाडी बनवली आहे. नुकतेच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसायिक असणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी जुगाड जिप्सी गाडी बनवली होती, त्याचा चर्चा सुरू असताना आता आणखी एक जुगाड गाडी सांगलीत तयार झाली आहे..

कर्नाळ रस्त्यावर काकानगर अशोक आवटी यांचे ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनांचे गॅरेज आहे. त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने आणि भन्नाट क्रिएटिव्हिटीने चक्क चार चाकी गाडी बनवली आहे. 2019 च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये युट्युबवर त्यांनी काही व्हिडीओ बघितले आणि आपल्या लहान मुलांसाठी काहीतरी वेगळी चार चाकी गाडी बनवता येईल का यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि परिश्रमानंतर एक भन्नाट चार चाकी गाडी बनवली आहे आणि ही अगदी हुबेहूब 1930 सालच्या फोर्ड गाडी प्रमाणे तयार केली आहे.

भंगारातील साहित्य आणि दुचाकी तसंच रिक्षाचे साहित्य वापरून त्यांनी ही अफलातून गाडी साकारली आहे. या गाडीची इंजन हे एमएटी दुचाकीचे आहे. गाडी सुरू करण्यासाठी रिक्षा प्रमाणे हँडल आहे, आणि रिव्हर्स गिअरसाठी या गाडीला रिक्षाचा गिअरबॉक्स बसवला आहे. स्टेरिंग हा छोट्या ट्रॅक्टरचा आहे, तर चाके ही एमएटी दुचाकीचे आहेत. तीन गियर असणारी ही चार चाकी प्रति लीटर 30 किलोमीटर इतके मायलेज देते. चार व्यक्ती या गाडीमध्ये बसू शकतात, एलडी हेडलाईट अशा सर्व गोष्टी आवटी यांच्या 'फोर्ड' मध्ये आहेत. आवटी यांची ही गाडी 1930 मॉडेलच्या फोर्ड गाडीप्रमाणे तयार झाली असून ती आता रस्त्यावर धावू लागली आहे. रस्त्यावरुन येणाजाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात नक्कीच ही गाडी यशस्वी ठरत आहे.

हे वाचा-डॉक्टर आईनं मुलीच्या खेळासाठी सोडले करिअर, मालविकाच्या यशामागे माऊलीचा मोठा वाटा

नुकताच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रेय लोहार यांनी अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन याच्या माध्यमातून जुगाड जिप्सी तयार केली आहे. याची दखल अगदी आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली त्यामुळे ही गाडी सध्या चर्चेत आहे, असे असताना सांगलीतल्या एका अशोक आवटी यांनीही एक जुगाड चार चाकी गाडी बनवली आहे.

First published:

Tags: Sangali