मुंबई, 19 ऑक्टोबर: सणासुदीच्या दिवसांत विविध कंपन्या आकर्षक योजना जाहीर करतात. अधिकाधिक लोकांनी प्रॉडक्ट विकत घ्यावीत हाच हेतू असतो. यामुळेच सगळे सणाला घर, दुकान, सोनं, इम्पोर्टेड वस्तू, वाहन असं विकत घेतातच. सणाचं निमित्त साधून टीव्हीएस या वाहन उत्पादक कंपनीने बाईकप्रेमींसाठी आकर्षक योजना जाहीर केली आहे. यानुसार तुम्ही केवळ 5,555 रुपयांच्या डाउनपेमेंटवर बाईक घरी घेऊन जाऊ शकता. इतकंच नाही तर एकूण रकमेवर ग्राहकांना डिस्काउंटही मिळणार आहे. जाणून घेऊयात योजनेबद्दलची सविस्तर माहिती. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलंय. टीव्हीएस मोटर कंपनीच्या बाईक्स या प्रसिद्ध आहेतच. बाईक निर्मितीतील देशातील अग्रगण्य अशी ही कंपनी आहे. या कंपनीने आता नवीन बाईक मार्केटमध्ये आणलीय. टीव्हीएस स्टारसिटी प्लस असं नव्या बाईकच नाव आहे. कंपनीने ग्राहकांसाठी आकर्षक डिस्काउंटही जाहीर केलाय. या बाईकची एक्स शोरूम किंमत ही 74,900 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक विकत घेतल्यास ग्राहकांना 8000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल. अशी ही 75,000 रुपयांची बाईक कमीतकमी पैशांमध्ये कशी विकत घेता येईल हे जाणून घेऊयात. हेही वाचा - पावसात इलेक्ट्रिक बाईक चालवली तर काय होईल? वाचा सविस्तर टीव्हीएस कंपनीची कुठलीही नवी बाईक घेतल्यास ग्राहकांना 2,100 रुपयांची सूट मिळेल. तसंच केवळ 5,555 रुपये डाउनपेमेंट करून तुम्ही टीव्हीएस कंपनीची नवी बाईक घरी घेऊन जाऊ शकाल. यासाठी तुम्हाला टीव्हीएसच्या अधिकृत डिलरकडे जाऊन बुकिंग करावं लागेल. स्टार सिटी प्लसची ही आहेत वैशिष्ट्यं टीव्हीएस स्टार सिटी प्लसचे 2 व्हेरियंट आहेत. ही बाईक मायलेज आणि उत्तम क्षमतेसाठी ओळखली जाते. टीव्हीएसने बीएस6 कॉम्प्लिएंटला 109.7सीसीची इंजिन क्षमता दिलीय. या बाईकला 4 स्पीड ट्रान्समिशन दिलेत. तसंच नव्या आणि सुधारित गोष्टींसहित फ्युअल इंजेक्टरही दिला आहे. टीव्हीएस कंपनीचं असं म्हणणं आहे की, या बाईकची ताशी 90 किलोमीटर वेगाची कमाल मर्यादा आहे. ग्राहकांसाठी ही नवी बाईक खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरू शकेल.
स्टार सिटी प्लसची किंमत टीव्हीएस कंपनीने आपल्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केलीय. या दरवाढीचा परिणाम स्टार सिटी प्लसशिवाय रेडर, रेडिओन आणि स्पोर्टससारख्या इतर बाईकच्या किंमतींवरही झालाय. स्टार सिटी प्लसची एक्स शोरूम किंमत ही 74,900 रुपयांपासून सुरू होतेय. तसंच या बाईकच्या टॉप व्हेरियंट मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही 78, 140 रुपये आहे. आता जाणून घेऊयात याच्या फीचर्स आणि मायलेचविषयी अधिक माहिती. स्टार सिटी प्लसचं मायलेज स्टारसिटी प्लस या बाईकचे सगळे हेडलाईटस हे एलईडी आहेत. टीव्हीएसची या स्वरूपातली ही पहिलीच बाईक आहे. याशिवाय यात इकोनोमीटरसोबत ट्विन पॉड अॅनॉलॉग क्लस्टर, टॅंक ग्रीप, यूएसबी चार्जिंग पॉईंट असे फीचर्सही आहेत. यात डिस्क ब्रेकचाही पर्याय आहे. कंपनीने मायलेजबाबत बोलताना म्हटलंय की, 1 लीटर पेट्रोलमध्ये 83.09 किलोमीटर पार करण्याची या बाईकची क्षमता आहे.