जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / पावसात इलेक्ट्रिक बाईक चालवली तर काय होईल? वाचा सविस्तर

पावसात इलेक्ट्रिक बाईक चालवली तर काय होईल? वाचा सविस्तर

पावसात इलेक्ट्रिक बाईक चालवली तर काय होईल? वाचा सविस्तर

पावसात इलेक्ट्रिक बाईक चालवली तर काय होईल? वाचा सविस्तर

इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान नवीन आहे, त्यामुळे त्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न तसेच शंका निर्माण होत आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं पावसाळ्यात इलेक्ट्रिक बाइक चालवता येईल की नाही असाही प्रश्न पडतो. या वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर: केवळ भारतातच नव्हे तर जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत आहे. यामागील साधे आणि स्पष्ट कारण म्हणजे पेट्रोल, डिझेल, सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा ई-वाहनं चालवणं स्वस्त पडतं आणि पर्यावरणालाही हानी पोहोचत नाहीत. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनं ही इतर वाहनांपेक्षा हलकी, कॉम्पॅक्ट आणि सुरक्षित असतात. मात्र हे तंत्रज्ञान नवीन असल्यानं त्याबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत राहतात. ज्यामध्ये पावसात इलेक्ट्रिक बाइक चालवता येईल की नाही असाही प्रश्न पडतो. या वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. पावसातही इलेक्ट्रिक बाईक चालवता येतात कारण ही वाहनं वॉटर-रेसिस्टेंट  असतात. पावसाळ्यातही ही वाहनं चालवता येतात यात शंका नाही, पण वॉटर-रेसिस्टेंट असूनही त्यांचा वापर करताना काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. फेंडर्स वापरा- फेंडर्स म्हणजेच व्हील कव्हर्स तुमच्या इलेक्ट्रिक बाइकच्या बॉडीला चिखलानं घाण होण्यापासून वाचवू शकतात, ज्यामुळे त्यावर गंज येण्याची शक्यता कमी होते. फेंडर हे ऑटोमोबाईल किंवा इतर वाहनांच्या चाकांवर एक मेटल किंवा प्लास्टिकचं आवरण असतं, जे चिखलापासून संरक्षण करते. बॅटरीची काळजी- पावसाळ्यात किंवा पावसात व्होल्टेजमध्ये खूप चढ-उतार होत राहतात, त्यामुळं या काळात बॅटरी चार्ज करणं टाळा. यामुळं बॅटरी खराब होऊ शकते. जर तुम्ही पावसात प्रवास करत असाल तर शरीरातील बॅटरीपर्यंत पाणी पोहोचणार नाही याची काळजी घ्या. पाण्यानं भरलेले खड्डे टाळा. हेही वाचा:  आता चालता चालता चार्ज होईल इलेक्ट्रिक कार, जगातील पहिली सोलर EV लाँच इलेक्ट्रिक बाइक स्वच्छ ठेवा- पावसात प्रवास करताना बाईक भिजणं किंवा घाण होणं हे सामान्य आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचे घर, ऑफिस किंवा इच्छित ठिकाणी पोहोचाल तेव्हा बाईक स्वच्छ करा आणि सुकवायला विसरू नका कारण घाण आणि पाण्यामुळे त्यावर गंज येऊ शकतो. जास्त वेगाने गाडी चालवू नका- पाऊस असो वा नसो, वाहन नेहमी आदर्श वेगानं चालवलं पाहिजे, परंतु पावसाळ्यात ही काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. या दरम्यान तुमच्या इलेक्ट्रिक बाइकवर पाणी पडू नये म्हणून इतर वाहनांपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची ई-बाईक हुशारीने निवडा- विविध बाइक्स वॉटरप्रूफिंग मानकांसह येतात, परंतु योग्य संशोधनानंतर तुम्हाला कोणती इलेक्ट्रिक बाइक खरेदी करायची हे ठरवावं लागेल. इलेक्ट्रिक बाईक सर्व हवामानात ड्रायव्हिंगसाठी योग्य असल्या तरी तुमच्या ई-बाईकमध्ये वापरलेले सर्व भाग चांगल्या दर्जाचे असल्याची खात्री करा. पावसात भिजल्यानंतर हलक्या दर्जाचे भाग अडचणीचे ठरू शकतात, परंतु उच्च दर्जाची बाईक काळजीपूर्वक हाताळली तर ई-बाईक पावसाळ्यातही बाइक चालवण्याचा पूर्ण आनंद देऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात