जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Bike Tips: किक मारून घामाघूम झाला तरीही बाईक स्टार्ट होत नाहीये? मग ‘या’ ट्रिक्सचा करा वापर

Bike Tips: किक मारून घामाघूम झाला तरीही बाईक स्टार्ट होत नाहीये? मग ‘या’ ट्रिक्सचा करा वापर

Bike Tips: किक मारून घामाघूम झाला तरीही बाईक स्टार्ट होत नाहीये? मग ‘या’ ट्रिक्सचा करा वापर

Bike Tips: किक मारून घामाघूम झाला तरीही बाईक स्टार्ट होत नाहीये? मग ‘या’ ट्रिक्सचा करा वापर

अनेकदा तुम्ही खूप दिवसांनी बाईक काढून ती सुरू करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती सहजासहजी सुरू होत नाही. तुम्ही किक मारून थकता पण गाडी सुरु होण्याचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वैतागून बाईक पुन्हा घरात लावता किंवा मग मेकॅनिककडे घेऊन जाता. परंतु एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्हाला यापुढे काळजी करण्याची गरज नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑक्टोबर: अनेकदा तुम्ही खूप दिवसांनी बाईक काढून ती सुरू करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती सहजासहजी सुरू होत नाही. तुम्ही किक मारून थकता पण गाडी सुरु होण्याचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वैतागून बाईक पुन्हा घरात लावता किंवा मग मेकॅनिककडे घेऊन जाता. परंतु एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्हाला यापुढे काळजी करण्याची गरज नाही. किंबहुना बाईक बराच वेळ बंद राहिल्यानं बॅटरी संपते आणि इंजिनमध्ये धूळ साचल्यामुळं मोटरसायकल सेल्फ स्टार्ट किंवा किक स्टार्ट होत नाही. अशा वेळी अस्वस्थ होण्यापेक्षा तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करावा, ज्यामुळे तुमची बाईक काही वेळात सुरू होईल. पेट्रोल असल्याची खात्री करा- बाईक सुरू होत नसेल तर आधी पेट्रोल आहे की नाही ते तपासा, कारण मोटारसायकल बाहेर काढल्यानंतर तिच्यामध्ये पेट्रोल कधी भरले ते कळत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की बाईकमध्ये पेट्रोल आहे, तर मोटारसायकल रिझर्व्ह मोडमध्ये ठेवण्याची गरज आहे का ते तपासा. कारण तेल कमी असताना रिझर्व्ह मोड आवश्यक आहे आणि नसेल तर बाइक सुरू होणार नाही. **हेही वाचा:** सेकंड हँड कमर्शिअल कारचं असं करा ट्रान्सफर, स्वस्तात खरेदी करता येईल  ही सॉलिड पद्धत वापरून पहा जर तुम्ही तुमची बाईक अनेक दिवसांनी फिरायला घेऊन गेलात आणि ती सुरू झाली नाही, तर तुम्ही काही सोप्या पद्धती वापरू शकता. आधी बाईक मेन स्टँडवर ठेवा, मग तिसर्‍या किंवा चौथ्या गिअरमध्ये बाईक लावा. यानंतर, मोटरसायकलचा मागील टायर वेगाने फिरवा. बाईक लगेच सुरू होईल असे दिसेल. तुम्हाला आणखी काही मदत करायची असेल, तर तुम्ही बाइकला तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरमध्ये ढकलून बाईक सुरू करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

चोक लावून बाईक चालवा- त्याचबरोबर अनेक वेळा दुचाकीच्या इंजिनमध्ये धूळ साचते आणि किक मारूनही पेट्रोल इंजिनमध्ये जात नाही, त्यामुळे मोटरसायकल सुरू होत नाही. विशेषत: अशा प्रकारची समस्या थंडीच्या मोसमात सर्वात जास्त असते आणि आता हिवाळा आला आहे. त्यामुळे तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो, जिथे किक मारूनही बाइक सुरू होत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bike
  • First Published :
जाहिरात
जाहिरात