मुंबई, 23 ऑक्टोबर: आपल्याकडं स्वतःच्या मालकीची कार असावी, हे अनेकांचं स्वप्न असतं. परंतु पैशाच्या कमतरतेमुळं अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशावेळी लोक सेकंड हँड कार खरेदी करून आपली पहिली कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात. ग्राहक अनेकदा सेकंड हँड कारचा शोध घेत असतात. परंतु त्यांना हव्या तशा सेकंड हॅड कार मिळत नाहीत. परंतु अशा अनेक व्यावसायिक नोंदणीकृत गाड्या उपलब्ध असतात, ज्या खूपच स्वस्त असतात. या कार कमर्शियल म्हणजेच टॅक्सी म्हणून वापरण्यासाठी नोंदणीकृत असल्या त्यामुळे बरेच ग्राहक ती खरेदी करण्यास टाळाटाळ करतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की व्यावसायिक कार खरेदी केल्यानंतर ती पर्सनल कारमध्ये बदलली जाऊ शकते.
आपण कमर्शियल कारला पर्सनल कारमध्ये सहजपणे रूपांतरित करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील तसेच थोडे पैसे खर्च करावे लागतील. विशेष बाब म्हणजे व्यावसायिक कार अनेकदा अत्यंत कमी किमतीत तसेच बऱ्याचदा चांगल्या स्थितीत उपलब्ध असतात. येथे आम्ही तुम्हाला कमर्शियल कारचे पर्सनल कारमध्ये रूपांतर कसं करावं हे सांगणार आहोत.
हेही वाचा: सणासुदीच्या काळात स्कूटर घ्यायचीये? 'हे' आहेत 5 सर्वोत्तम पर्याय, किंमतही कमी
याप्रमाणे अर्ज करू शकतात-
सर्वप्रथम कार खरेदीदाराने कारचा कमर्शियल परवाना रद्द करण्यासाठी अर्ज करावा लागतो. यानंतर पर्सनल कारच्या नोंदणीसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. कार खरेदी केल्यानंतर मालकानं संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना कमर्शियल कारची नोंदणी रद्द करण्याच्या कारणांसह अर्ज लिहावा लागतो. यासाठी तुम्ही आरटीओ फॉर्म एसीसीद्वारे अर्ज करू शकता.
ही कागदपत्रे जमा करावी लागतात-
कमर्शियल रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी अर्जदाराला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत देखील सादर करावी लागेल. तसेच कार बँक फायनान्समधून खरेदी केली असल्यास बँकेची एनओसी सादर करावी लागेल. आरटीओने वाहनाचं कमर्शियल रजिस्ट्रेशन रद्द केल्यानंतर एनओसी मिळते. यानंतर वाहन मालक वैयक्तिक नोंदणीसाठी पुन्हा अर्ज करू शकतो.
तुम्ही ऑनलाइन प्रक्रिया देखील पूर्ण करू शकता-
पॅन कार्डची छायाप्रत, छायाचित्र, रद्द केलेल्या नोंदणीची NOC, नोंदणीसाठी फॉर्म 20, फॉर्म 35 (लागू असल्यास) तसेच वैयक्तिक नोंदणी अर्जासाठी ओळखीचा पुरावा आणि पत्ता यासारख्या कागदपत्रांसह रोड टॅक्स सादर करावा लागेल. ही प्रक्रिया वाहन पोर्टलद्वारे ऑनलाइन देखील पूर्ण केली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car