मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Bike Mileage Tips: तुमची बाइकही देईल जबरदस्त मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Bike Mileage Tips: तुमची बाइकही देईल जबरदस्त मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Bike Tips and Tricks: तुमची बाइकही देईल उत्तम मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

Bike Tips and Tricks: तुमची बाइकही देईल उत्तम मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

Bike Mileage Tips: देशातील कोट्यवधी लोक दुचाकीचा वापर करतात. मात्र लोकांना बाइक चालवताना मायलेजशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 29 ऑगस्ट: भारतात बाइक चालकांची संख्या खूप जास्त आहे. देशातील कोट्यवधी लोक दुचाकीचा वापर करतात. मात्र लोकांना बाइक चालवताना मायलेजशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा आपली बाईक जास्त मायलेज देत नसल्याचं (How To Increase Bike Mileage) पाहायला मिळतं. बाइकचे मायलेज कमी-जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. कारण अलीकडच्या काळात पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत जर तुमची बाईक चांगलं मायलेज देत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या बाइकचं मायलेज वाढवू शकता. बाईकचं मायलेज वाढल्यानंतर तुमच्या पेट्रोलची खूप बचत होईल. चला जाणून घेऊया खास टिप्स-

ब्रेकचा वापर फूट रेस्टसारखा करू नका-

अनेकदा लोक ब्रेकचा वापर फूट रेस्ट म्हणून करतात. तुम्हीही ही चूक करत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या बाइकच्या मायलेजवर होतो. अधिक मायलेज मिळविण्यासाठी, तुम्ही तुमचा पाय ब्रेक पँडलवर न ठेवता, तो फूटरेस्टवरच ठेवावा.

बाईकची वेळोवेळी सर्व्हिस करत रहा-

तुम्ही तुमची बाईक वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहावी. सर्व्हिसिंग केल्यानं तुमच्या बाईकची चेन, इंजिन आणि इतर ठिकाणं व्यवस्थित ऑईल होतात. याचा थेट परिणाम तुमच्या बाइकच्या परफॉर्मन्स आणि मायलेजवर होतो.

हेही वाचा- आता बीएस 6 वाहनांमध्येही बसवता येईल CNG अन् LPG किट, सरकारनं दिली मान्यता

दुचाकीवर अतिरिक्त भार टाकू नका-

अनेकदा बाइकवर अतिरिक्त भार टाकल्यानं तिचे मायलेज कमी होते. अतिरिक्त भार थेट बाईकच्या इंजिनवर परिणाम करतो. वाढलेल्या भारामुळे तिला जास्त इंधन वापरावं लागतं. यामुळं बाइकचं मायलेज मोठ्या प्रमाणात कमी होतं.

दुचाकी मध्यम वेगाने चालवा-

तुम्ही तुमची बाईक सरासरी वेगानं चालवावी. बाईक वेगानं चालवल्यास त्यात इंधनाचा वापर खूप जास्त होतो. अशा परिस्थितीत, अधिक मायलेज मिळविण्यासाठी, आपण ती मध्यम आणि एकसारख्या वेगाने चालवावी.

First published:

Tags: Best average bike, Bike, Mileage