जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / आता बीएस 6 वाहनांमध्येही बसवता येईल CNG अन् LPG किट, सरकारनं दिली मान्यता

आता बीएस 6 वाहनांमध्येही बसवता येईल CNG अन् LPG किट, सरकारनं दिली मान्यता

आता बीएस 6 वाहनांमध्येही बसवता येईल CNG अन् LPG किट, सरकारनं दिली मान्यता

आता बीएस 6 वाहनांमध्येही बसवता येईल CNG अन् LPG किट, सरकारनं दिली मान्यता

BS-VI पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये CNG आणि LPG किटच्या रिट्रोफिटमेंटला सरकारनं परवानगी दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑगस्ट: उत्सर्जन नियमांचं पालन करणार्‍या BS-VI पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये CNG आणि LPG किटच्या रिट्रोफिटमेंटला सरकारने परवानगी दिली आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या बीएस-6 इंजिन असलेल्या कारमध्ये सीएनजी (CNG) आणि एलपीजी (LPG) किट बसवायचं असेल तर आता तुम्हाला ते बसवता येईल. यापूर्वी फक्त BS-IV इंजिन वाहनांना किट बसवण्याची परवानगी होती. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं (MoRTH) एका अधिसूचनेत म्हटलं आहे की, BS (भारत स्टेज)-VI पेट्रोल वाहनांवर सीएनजी आणि एलपीजी किटचे रिट्रोफिटमेंट आणि बीएस-VI वाहनांच्या बाबतीत 3.5 टन पेक्षा कमी डिझेल इंजिन सीएनजी/एलपीजीनं बदलता येईल. जारी केलेल्या अधिसूचनेत असंही म्हटलं आहे की CNG हे पर्यावरणास अनुकूल इंधन आहे. ते पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन्स, कण आणि धूर यांचे उत्सर्जन पातळी कमी करेल. संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातून दिलासा- गेल्या तीन महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले, तरीही ही किंमत 100 च्या जवळपास आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त खर्च जनतेला सहन करावा लागत आहे. त्याच वेळी, जर बीएस-6 इंजिन असलेली वाहने जुनी असतील तर त्यांच्या मायलेजवरही परिणाम होईल आणि पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत सीएनजी आणि एलपीजी किट तुमची मदत करू शकतात. याचा वापर करून तुम्ही कमी खर्चात जास्त अंतराचा प्रवास करू शकाल. हेही वाचा-  Ford Motors: ‘या’ प्रसिद्ध कार कंपनीत होणार 3,000 कामगारांची कपात; काय होईल परिणाम, वाचा सविस्तर BS4 स्टँडर्ड डिझेल कार 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहेत- वेगाने वाढणारं वायू प्रदूषण लक्षात घेऊन दिल्ली सरकारच्या एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशननं याला तोंड देण्यासाठी नवीन धोरण तयार केलं आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, दिवाळीपूर्वी 1 ऑक्टोबरपासून BS-IV इंजिन असलेल्या डिझेल गाड्यांवर बंदी घातली जाऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही या वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किट देखील वापरू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car
  • First Published :
जाहिरात
जाहिरात