मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /रस्त्यावर वेगात वाहन चालवत असाल तर सावधान! स्पीड ट्रॅकर कॅमेराची अशी राहिल नजर

रस्त्यावर वेगात वाहन चालवत असाल तर सावधान! स्पीड ट्रॅकर कॅमेराची अशी राहिल नजर

रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून आता रस्त्यावर स्पीड ट्रॅकर कॅमेरे (Speed Tracker Camera) लावण्याची सुरुवात करण्यात आली आहे. हे कॅमेरे रस्त्यावरील खांबांवर लावले जातील आणि वेगात असणाऱ्या वाहनाची सूचना पोलिसांपर्यंत पोहोचवतील.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : भारतात इतर देशांच्या तुलनेत रस्ते अपघातांची (Road Accident) संख्या अतिशय जास्त आहे. भारतात अधिकतर दुर्घटना वाहनाचा अति वेग आणि ट्रॅफिक नियमांचं पालन न करण्यामुळे होतात. सरकार आणि पोलीस विभाग मिळून या दुर्घटना कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आता सरकारकडून रस्त्यावर स्पीड ट्रॅकर कॅमेरे (Speed Tracker Camera) लावण्याची सुरुवात करण्यात आली आहे. हे कॅमेरे रस्त्यावरील खांबांवर लावले जातील आणि वेगात असणाऱ्या वाहनाची सूचना पोलिसांपर्यंत पोहोचवतील. हे कॅमेरे ऑटोमेटिक काम करतात आणि आवश्यक त्या सूचना सिस्टमपर्यंत पोहोचवतात.

सध्या हे कॅमेरे दिल्ली आणि हरियाणातील काही रस्त्यावर लावण्यात आले आहेत. पोलिसांनी आपल्या गाडीच्या मागे एक स्पीड डिटेक्शन सिस्टम लावलं आहे, ज्यावर स्पीडमध्ये चालणाऱ्या वाहनांची माहिती पोलिसांना मिळेल. या सिस्टमच्या मदतीने पोलीस वेगात असणाऱ्या वाहनाची ओळख करुन त्यांचं चालान कापलं जाईल.

पोलिसांनी हे स्पीड डिटेक्शन सिस्टम मारुती सुझुकी Ertiga मध्ये इन्स्टॉल केलं आहे, ज्यावर पोलीस विभागातील एक जण नेहमी लक्ष ठेवून असेल. वेगात असणाऱ्या वाहनांना डिटेक्ट करुन ही माहिती अधिकाऱ्यांना दिली जाईल, त्यानंतर पुढे त्या वाहनाला थांबवून चालान कापलं जाईल. हे चालान 2000 रुपयांपर्यंत असू शकतं. त्याशिवाय चालकाचं तीन महिन्यांपर्यंत लायसन्सही रद्द केलं जाऊ शकतं.

सातत्याने गाडीत AC सुरू असल्यास मायलेजवर होतो परिणाम? अशापद्धतीने करा वापर

कसं काम करतो स्पीड ट्रॅकर कॅमेरा -

स्पीड ट्रॅकर कॅमेरावर आधारित असून, ज्यात स्पीड ट्रॅक करण्यासाठी डॉप्लर इफेक्टचा वापर केला जातो. हे कॅमेरे रेडिओ वेव्सवर काम करतात. हे रेडिओ वेव्स लाईटसह ट्रॅव्हल करणाऱ्या वाहनाला कनेक्ट होतात आणि सिस्टमपर्यंत स्पीडची रिअल टाईम माहिती मिळवतात.

हे स्पीड ट्रॅकर कॅमेरे ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकॉग्नेशिन सिस्टमसह येतात. जे स्पीडसह वाहनाचा नंबरही ट्रॅक करतात. या कॅमेराच्या नजरेत न येणं हे अतिशय कठीण आहे. त्यामुळे पोलिसांना या कॅमेराची मोठी मदत होणार आहे.

First published: