मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Gmail वापरताना या तीन चुका टाळाच; अन्यथा अकाउंट होईल बॅन

Gmail वापरताना या तीन चुका टाळाच; अन्यथा अकाउंट होईल बॅन

 जगातील सर्वांत जास्त वापरली जाणारी ई-मेल सर्व्हिस म्हणजे जी-मेल. कोट्यवधी लोक दररोज यावरून एकमेकांशी संवाद साधतात, आणि माहितीची देवाण-घेवाण करतात. तुम्हीदेखील रोज किमान एक तरी ई-मेल वाचत किंवा पाठवत असालच. मात्र, जीमेल (Gmail rules) वापरण्यासंबंधी काही नियम तुम्हाला माहिती आहेत?

जगातील सर्वांत जास्त वापरली जाणारी ई-मेल सर्व्हिस म्हणजे जी-मेल. कोट्यवधी लोक दररोज यावरून एकमेकांशी संवाद साधतात, आणि माहितीची देवाण-घेवाण करतात. तुम्हीदेखील रोज किमान एक तरी ई-मेल वाचत किंवा पाठवत असालच. मात्र, जीमेल (Gmail rules) वापरण्यासंबंधी काही नियम तुम्हाला माहिती आहेत?

जगातील सर्वांत जास्त वापरली जाणारी ई-मेल सर्व्हिस म्हणजे जी-मेल. कोट्यवधी लोक दररोज यावरून एकमेकांशी संवाद साधतात, आणि माहितीची देवाण-घेवाण करतात. तुम्हीदेखील रोज किमान एक तरी ई-मेल वाचत किंवा पाठवत असालच. मात्र, जीमेल (Gmail rules) वापरण्यासंबंधी काही नियम तुम्हाला माहिती आहेत?

पुढे वाचा ...

   मुंबई, 15 जुलै-   जगातील सर्वांत जास्त वापरली जाणारी ई-मेल सर्व्हिस म्हणजे जी-मेल. कोट्यवधी लोक दररोज यावरून एकमेकांशी संवाद साधतात, आणि माहितीची देवाण-घेवाण करतात. तुम्हीदेखील रोज किमान एक तरी ई-मेल वाचत किंवा पाठवत असालच. मात्र, जीमेल  वापरण्यासंबंधी काही नियम तुम्हाला माहिती आहेत? या नियमांचं चुकूनही उल्लंघन झालं, तर तुमचं जीमेल अकाउंट बंद होऊ शकतं.खरं तर जीमेल वापरण्यासाठीचे तीन सोपे नियम आहेत, ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. हे नियम कोणते आहेत, आणि त्यांचं पालन न केल्यास काय होईल, जाणून घेऊयात.

  वारंवार ई-मेल पाठवू नका-

  जीमेलचा वापरच ई-मेल पाठवण्यासाठी आपण करतो. तेव्हा वारंवार ई-मेल पाठवू नका हा नियम कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र, जीमेलने दैनंदिन ई-मेल्सच्या संख्येवर नियंत्रण (Gmail daily mail limit) ठेवण्यासाठी हा नियम लागू केला आहे. या नियमामुळे तुम्ही दिवसाला 500हून अधिक ई-मेल पाठवू शकत नाही. हे लिमिट क्रॉस केलं, तर तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं.

  याशिवाय जर तुम्ही स्पॅम मेसेज (Gmail spam mail rule) पाठवण्याचा प्रयत्न करताय असा गुगलला संशय आला, तर तुमचं अकाउंट काही काळासाठी बॅन करण्यात येतं. हा कालावधी एक तास ते 24 तास एवढा असू शकतो. वारंवार अशा प्रकारचा प्रयत्न करताय असं त्यांना लक्षात आल्यास तुमचं अकाउंट कायमचं बंद होऊ शकतं.

  चुकीच्या ई-मेल आयडीवर वारंवार करू नका मेल

  जर तुम्ही इनअ‍ॅक्टिव्ह ई-मेल आयडीवर बल्कमध्ये मेल पाठवत असाल, तर गुगल तुमच्या अकाउंटला रेड फ्लॅग (Gmail red flag) करू शकतं. असं केल्याने गुगलचं अल्गोरिदम (Google algorithm) तुम्हाला एक स्पॅमर समजेल, आणि परिणामी तुमचं अकाउंट डिसेबल किंवा तात्पुरतं बॅन होऊ शकतं.

  जेव्हा तुम्ही चुकीच्या किंवा नॉन-अ‍ॅक्टिव्ह पत्त्यावर ई-मेल (Don’t send Email on wrong address) पाठवता, तेव्हा तो मेल बाउन्स होऊन तुमच्याकडे परत येतो. अशा प्रकारचे भरपूर बाउन्स मेल जर तुमच्याकडे आले, तर गुगल तुम्हाला स्पॅमर समजतं. त्यामुळे कोणताही मेल पाठवण्यापूर्वी ई-मेल आयडी तपासून घेणं गरजेचं आहे.

  (हे वाचा:... तर तुमचा स्मार्टफोन तुम्हाला जेलमध्ये पोहचवू शकतो, फोन वापरताना काय काळजी घ्याल? )

  ई-मेलवरून बेकायदेशीर कंटेंट पाठवणं-

  जर तुम्ही ई-मेलच्या माध्यमातून बेकायदेशीर (Don’t share illegal content through Gmail) असलेली लिंक, फोटो, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट पाठवत असाल, तर तुमचं अकाउंट बॅन होईल. सोबतच, गुगलच्या पॉलिसीच्या विरुद्ध असणारी माहिती शेअर केल्यासही अशी कारवाई होऊ शकते. हत्यारांची खरेदी-विक्री, ड्रग्ज तस्करी, कॉपीराईट असणारा म्युझिक व्हिडिओ किंवा चित्रपट इत्यादी गोष्टींचा यात समावेश होतो.गुगलचा असा दावा आहे, की ते कोणत्याही युजरचा ई-मेल वाचत नाहीत. कंपनीने डेव्हलप केलेलं एआय डिटेक्शन फीचर (Gmail AI detection feature) लोकांच्या ई-मेलमधील कंटेंटचं परीक्षण करतं, आणि संशयित मेल्सची सूचना देतं. बेकायदेशीर गोष्टींचा मेल पाठवण्याचा प्रयत्न करताच तुम्हाला ‘You have reached a limit for sending mail’ किंवा ‘Error Message’ दिसेल.

  अशा प्रकारे तीन सोप्या नियमांचं पालन करून, तुम्ही निश्चिंतपणे गुगलच्या ई-मेल सेवेचा वापर करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Gmail, Technology