नवी दिल्ली, 4 मे: सॅमसंग (Samsung) ही अग्रगण्य मोबाइल उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे अनेक स्मार्टफोन्स (Smart Phones) ग्राहकांच्या पसंतीस नेहमीच उतरताना दिसतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगच्या एका महागड्या हॅण्डसेटबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यात सॅमसंगच्या प्रिमियम फोन वर्गवारीतील एक महागडा असलेल्या सॅमसंग गॅलक्सी एस 20 (Samsung Galaxy S20) या फोनच्या कॅमेरा कव्हर वरील आपोआप तुटत असल्याची समस्या समोर आली आहे. त्यामुळे या महागड्या फोनमध्ये हलक्या दर्जाच्या काचेचा वापर केल्याने ती तुटत असल्याचा आरोप ग्राहकांमधून केला जात आहे. याबाबत ग्राहकांनी न्यायालयात खटला देखील दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की कंपनीने मोठे मूल्य वसूल करुनही सॅमसंगने या कमतरतेचा समावेश वॉरंटी अंतर्गत करण्यास नकार दिला आहे. सॅमसंगने सॅमसंग गॅलक्सी एस 20 हा स्मार्टफोन गतवर्षी फेब्रुवारीत लॉन्च केला होता. भारतात या फोनची प्रारंभिक किंमत 40,000 रुपयांपासून आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, हा खटला (Case) 27 एप्रिलला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सॅमसंगवर फसवणूक, वॉरंटचा भंग, ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्या ग्राहकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यापैकी बहुतांश ग्राहक हे अमेरिकी नागरिक आहेत. हे ही वाचा- मिस्ड ग्रुप कॉलपासून,आपोआप फोटो गायब होण्यापर्यंत WhatsAppवर येणार हे 5 नवे फीचर अशी अचानक तुटते काच लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस 20 स्मार्टफोनच्या रिअर कॅमेराच्या काचेच्या कव्हरवर कोणत्याही प्रकारचा दाब पडला तर ते आपोआपच तुटून पडते. ज्या लोकांनी या फोनला बॅक कव्हर लावले आहे. त्यांना देखील या समस्येचा सामना करावा लागत आहे. कॅमेराचे काचेचे कव्हर तुटल्यावर त्या ठिकाणी बुलेट होल पॅटर्न म्हणजे गोळी लागल्यावर जसे निशाण उमटते तसे या ठिकाणी दिसून येते, असे लोकांनी सांगितले. खटल्यात असंही म्हटलं आहे की ग्राहकांनी सॅमसंगकडून फोनसाठी 400 डॉलरपर्यंत विमा (Insurance) घेतलेला असला तरी फोन दुरुस्तीचा त्यात समावेश नाही. त्यामुळे त्यांना दुरुस्तीकरिता 100 डॉलर अधिक खर्च करावे लागतात. खटला लढणारे वकील काय म्हणतात सॅमसंगच्या या फोनबाबत ज्या लोकांनी सॅमसंग विरोधात खटला दाखल केला आहे,त्यांच्यातर्फे न्यायालयात लढणारे स्टिव बर्मन यांच्या म्हणण्यानुसार,कंपनीकडून दिली जाणारी विश्वासार्हता जपण्यात सॅमसंग अपयशी ठरली आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांना एक विश्वासनीय स्मार्टफोनची गरज होती. मात्र या समस्येने त्यांच्या अडचणीत आणखीनच भर टाकली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.