थार जिम्नी या दोघांपेक्षाही एकदम भारी अशी एक गाडी लाँच होणार आहे. ऑटो एक्सपोच्या निमित्ताने ह्या गाडीचं मॉडेल संपूर्ण जगाला पाहता आलं. ह्या गाडीची ट्रायल जर यशस्वी झाली तर भारतासाठी सर्वात मोठी गोष्ट असणार आहे. याचा फायदा इंडियन आर्मी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना होणार आहे. ही गाडी लाँच झाली तर शत्रूंचं मात्र काही खरं नसेल एवढं नक्की.
या गाडीचे लाइट एवढे जबरदस्त आहेत की दुसऱ्या कुठल्याही लाईटची आवश्यकता लागत नाही. अडीच किलो वजन खेचून नेण्याची या गाडीची क्षमता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याला एअर लिफ्ट हुक्स, वेपन माउंट अशा काही सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही सुविधा देण्यात आल्या आहेत. ही गाडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.