ऑटो एक्सपो 2023 ची सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या आगामी कारचे मॉडेल्स इथे दाखवले आहेत. याशिवाय बदलेले तंत्रज्ञान देखील इथे ग्राहकांना दाखवलं जात आहे. या मेळाव्यात अनेक दिग्गज, कलाकार व्यावसायिकांनी उपस्थिती दर्शवली.
या मेळाव्यात मारुती कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक एसयूवी eVX कार कशी असेल त्यामध्ये कोणते फीचर असतील याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. कारच्या मॉडेलचे फोटो देखील समोर आले आहेत.
या कारला 60kWh बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 550 किमी ही गाडी धावणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. EVX मॉडल 2025 मध्ये लाँच केलं जाणार आहे. Maruti Baleno वर आधारित असं हे मॉडेल असणार आहे.
एरोडायनामिक सिल्हूट, मोठे व्हीलबेस, छोटे ओवरहँग्स, हाई ग्राउंड क्लीयरेंस असे फीचर्स या गाडीमध्ये मिळणार आहे. याची लांबी 4.3 मीटर असणार आहे.
4,300mm लांब 1,800mm रुंद आणि 1,600mm उंच असे डायमेंन्शन असणार आहेत. 60kWh बॅटरी पॅक यासोबत सेफ ड्रायव्हिंग टेक्नोलॉजी मिळणार आहे.
सध्या हे कॉन्सेप्ट मॉडेल आहे. ग्राहकांना यामध्ये कोणते रंग मिळणार याची किंमत ऑन रोड काय असेल याची माहिती देखील लवकरच मिळणार आहे.