जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Facebook Data Leak मध्ये तुमची वैयक्तिक माहिती leak झाली आहे का? वाचा कसं तपासाल

Facebook Data Leak मध्ये तुमची वैयक्तिक माहिती leak झाली आहे का? वाचा कसं तपासाल

Facebook feature

Facebook feature

अलीकडेच सुमारे 53.3 कोटी फेसबुक युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती हॅकर्स फोरमवर ऑनलाइन मोफत उपलब्ध करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 07 एप्रिल: अलीकडेच सुमारे 53.3 कोटी फेसबुक युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती हॅकर्स फोरमवर ऑनलाइन मोफत उपलब्ध करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बिझनेस इनसायडर’ने याबाबत माहिती दिली होती. हडसन रॉक (Hudson Rock) या सायबर क्राइम इंटेलिजन्स फर्मचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अॅलॉन गल (Alon Gal) यांनी सर्वप्रथम ही माहिती दिली आणि बिझनेस इनसायडरने त्याविषयीचं वृत्त सगळ्यात आधी प्रसिद्ध केलं होतं. गल यांच्या दाव्यानुसार,या लीक झालेल्या माहितीमध्ये 106 देशांमधल्या फेसबुक युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा (Personal Information) समावेश आहे. त्यात अमेरिकेतल्या 3.2कोटींहून अधिक, ब्रिटनमधल्या 1.1कोटी आणि भारतातल्या 60लाख युजर्सच्या माहितीचा समावेश आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग, सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस, डस्टिन मोस्कोव्हिट्झ आदींच्या माहितीचाही त्यात समावेश असल्याचं बोललं जात आहे. इंडिया टुडे ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. फेसबुक युजर्सचे फोन नंबर्स, फेसबुक आयडी, पूर्ण नावं, लोकेशन्स, जन्मतारखा, बायोज, रिलेशनशिप स्टेटस, अकाउंट तयार केल्याची तारीख आणि काही वेळा ई-मेल अॅड्रेसअशा माहितीचा त्यात समावेश आहे. (हे वाचा- Facebook CEO मार्क जुकरबर्ग यांचा फोन नंबर लीक; झाला सर्वात मोठा खुलासा ) अॅलॉन गल यांनी काही ट्वीट्स करून असा दावा केला आहे, की 533 दशलक्ष फेसबुक युजर्सचा (Facebook Users) डेटा लीक (Data Leaked) करून मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. ‘तुम्ही फेसबुकवर असाल, तर तुमचाही डेटा यात असण्याची शक्यता आहे,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘एवढी माहिती लीक होणं म्हणजे खासगीपणावर मोठाच परिणाम आहे. तुमच्या माहितीकडे एवढं दुर्लक्ष केल्याची कबुली फेसबुककडून दिली गेल्याचं मी तरी अजून पाहिलं नाही,’ असं गल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही माहिती सोशल इंजिनीअरिंग, स्कॅमिंग, हॅकिंग, मार्केटिंग आदींसाठी वापरली जाण्याचा धोका आहे, असा इशारा गल यांनी दिला आहे. दरम्यान, तुमचा फोन नंबर अशा प्रकारे लीक झाला आहे का, हे तपासण्यासाठी काही मार्ग आहेत. तसंच तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचे काही डिटेल्स लीक झाले आहेत का, हे तपासण्याची सोयही काही वेबसाइट्स देतात. तुमची माहिती लीक झाली आहे का? मीडिया अहवालानुसार https://haveibeenpwned.com/ ही यासाठीच्या सर्वांत लोकप्रिय वेबसाइट्सपैकी एक आहे. या वेबसाइटवर जाऊन तुम्हाल फेसबुकला लॉगिन करण्यासाठी वापरत असलेला ई-मेल आयडी त्यावर टाइप करावा लागेल. त्यानंतर फेसबुकद्वारे तुमचा डेटा लीक झाला आहे का हे तुम्हाला सांगितलं जाईल. तसेच अन्य कुठल्या प्रकरणांद्वारेही तुमचा डेटा लीक झाला आहे का, हेही सांगितलं जाईल. अलीकडेपर्यंत या वेबसाइटवर केवळ ई-मेल अॅड्रेसचीच तपासणी करता येत होती. आता मात्र यावेबसाइटचा निर्माता ट्रॉय हंट याने मोबाइल नंबरही सर्च करण्याची सोय दिली आहे. त्यासाठी मोबाइल नंबर आंतरराष्ट्रीय कोडसह टाकावा लागतो. https://www.thenewseachday.com/ ही देखील एक वेबसाइट असून, गिझ्मोडोने या वेबसाइटची शिफारस केली आहे. तुमचा मोबाइल नंबर लीक झाला आहे का,हे याद्वारे शोधता येतं. ही वेबसाइट केवळ अमेरिकेतल्या फोन नंबर्ससाठी आहे, असा उल्लेख BGR.in या वेबसाइटवर आढळतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात