संतापजनक! औरंगाबादमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

संतापजनक! औरंगाबादमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

Crime in Aurangabad: औरंगाबादमध्ये छेडछाडीची (Woman molestation) एक संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 28 ऑगस्ट: औरंगाबादमध्ये छेडछाडीची (Woman molestation) एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आरोपीनं पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिला मारहाण (woman beaten up) केली आहे. एवढंच नव्हे तर तिला शिवीगाळ करत तिच्या अंगावरचे कपडे (Woman Abused and torn her cloths) देखील फाडले आहे. या धक्कादायक घटनेनंतर विवस्त्र झालेल्या महिलेला रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या अंगावरचे कपडे घालायला दिले आहेत. यावेळी काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज परिसरातील बजाज कंपनीच्या गेटजवळ घडली आहे. भर दिवसा रस्त्यावरच हा संतापजनक प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीनं पीडित महिलेला रिक्षातून उतरवत तिच्यासोबत छेडछाड केली आहे. हे प्रकरण एवढ्यावरचं थांबलं नाही तर आरोपीनं तिचे कपडे देखील फाडले आहेत. या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

हेही वाचा-...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

पण विवस्त्र झालेली महिला भेदरलेल्या अवस्थेत रस्त्यावर जाताना काही नागरिकांना दिसली. यावेळी रस्त्यावरील नागरिकांनी आपल्या अंगावरील कपडे काढून पीडित महिलेला दिले आहेत. यानंतर पीडित महिला बराच काळ रस्त्यावर बसून रडत होती. रस्त्यावरील अनेकांनी तिच्यासोबत घडलेला प्रकाराबाबत विचारणा केली असता, तिला काहीही सांगता येत नव्हतं. आरोपीनं पीडित महिलेला चावा घेत, तिचं मंगळसूत्र देखील लंपास केल्याचा दावा पीडितेनं संबंधित व्हिडीओत केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा-Gang Rape च्या घटनेनं पुणे हादरलं; 25 वर्षीय तरुणीसोबत चौघांचं घृणास्पद कृत्य

दुसऱ्या एका घटनेत, औरंगाबादमध्ये एका तरुणीनं रिक्षातून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. प्रवास सुरू असताना रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यामुळे पीडित तरुणीनं तत्काळ तो रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितलं. मात्र तिचं काहीही न ऐकता रिक्षा चालकानं आणखीच वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून पीडितेनं उडी मारली. या प्रकरात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Published by: News18 Desk
First published: August 28, 2021, 4:03 PM IST

ताज्या बातम्या