मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Love Triangle : विश्वासघात असह्य झाल्याने पतीची आत्महत्या, पत्नीनेही पेटवून घेत संपवलं जीवन

Love Triangle : विश्वासघात असह्य झाल्याने पतीची आत्महत्या, पत्नीनेही पेटवून घेत संपवलं जीवन

 आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन (Suicide of husband and wife in extra marital affair case) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

भोपाळ, 22 ऑक्टोबर :  आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन (Suicide of husband and wife in extra marital affair case) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळल्यानंतर दुःख असह्य (Wife burned herself) झालेल्या पत्नीनं स्वतःला पेटवून घेत आपलं आयुष्य संपवलं.

अशी घडली घटना

काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली बिहारची राजधानी भोपाळमध्ये. इथं राहणाऱ्या अक्षय सोमकुंवर यांचं काही वर्षांपूर्वी सुधाशी लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांचा मुलगादेखील आहे. एका इमारतीतील लिफ्टमन म्हणून काम करणाऱ्या अक्षय यांना गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांबाबत माहिती समजली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.

कुटुंबाला बसला धक्का

घटनेच्या दिवशी अक्षय यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. आपल्या मुलाला लटकलेलं पाहून त्याच्या आईने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावून घेतलं आणि अक्षयला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पत्नीनंही केली आत्महत्या

पतीनं आत्महत्या केल्याचं लक्षात आल्यावर पत्नी सुधानेही स्वतःला पेटवून घेत आपली जीवनयात्रा संपवली. आपल्यासोबत 4 वर्षांच्या मुलालाही पेटवण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र घरच्यांनी मुलाला कसंबसं यातून वाचवलं. सुधा या घटनेत गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

हे वाचा- Alert! कांद्यामुळे 652 जणांना गंभीर संसर्ग; चुकूनही खाऊ नका असा Onion

गुंतागुंतीचा लव्ह ट्रँगल

अक्षय आणि सुधा यांच्या प्रकऱणाची कहाणी गुंतागुंतीचं असल्याची माहिती अक्षयचा भाऊ निलेशनं माध्यमांना दिली. अक्षयचा मित्र सागरनं त्याच्या पाठीत खंजीर खुपसत त्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्याचं त्यानं सांगितलं आहे. सागर आणि सुधा यांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. हळूहळू हे संबंध अधिक दाट होत गेले आणि सुधा आपल्या पतीला सोडून सागरसोबत राहायला गेली होती. या घटनेनं व्याकूळ असलेल्या अक्षयनं आत्महत्येचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Bihar, Crime, Love story, Sucide