मुंबई, 28 ऑगस्ट : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने काही तासांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताच्या येणाऱ्या नव्या शोचा टीचर तिने आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या शोचं नाव ‘पवित्र रिश्ता 2.0’ असं असून हा टीजर अत्यंत रोमँटिक असल्याचं दिसत आहे. हा ‘पवित्र रिश्ता’ चा डिजिटल स्पिन ऑफ आहे. अंकिता यात अर्चनाचा रिप्राइज्ड भूमिका साकारत असून शाहीर शेख याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला रिप्लेस केलं आहे. आता तो मानवची भूमिका साकारत आहे. (Ankita shared Pavitra Rishta 2.0 teaser ) ‘पवित्रा रिश्ता 2.0’ (Pavitra Rishta 2.0 Teaser) जी 5 अॅपवर स्ट्रीम होत आहे. पवित्र रिश्ता 2.0 च्या टीजरच्या सुरुवातीला अंकिता पावसाता भिजताना दिसत आहे. या टीजरमध्ये शेवटी दोघे महाराष्ट्रीय पद्धतीने लग्नाच्या बंधनात बांधल्याचं दिसत आहे. टीजरच्या बँकग्राऊंडमध्ये एक रोमँटिक म्युजिकदेखील सुरू आहे. याशिवाय एक व्हॉइसओव्हर देखील सुरू आहे. अंकिताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर तिने एक कॅप्शनदेखील दिलं आहे. हे ही वाचा- #UninstallHotstar का होतंय ट्विटरवर ट्रेंड? या सीरिजमुळे भडकले युजर्स
दुसरीकडे शाहीर शेख (Shaheer Sheikh) यानेही हा टीजर शेअर केला आहे. ही मालिका एकता कपूर प्रॉड्यूस करीत आहे. सुशांत सिंह राजपूर याच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडेने एकता कपूरला पवित्र रिश्ताची पुन्हा निर्मिती करण्याची मागणी केली होती. ज्यातून ती सुशांत सिंह राजपूत याला ट्रिब्युट देऊ शकेल. एकता कपुरनेही याला तातडीने सहमती दिली होती.