रात्री कुटुंबीयांसोबत शेवटचं जेवला अन् सकाळी आढळला मृतावस्थेत; वहीत लिहिलेली व्यथा वाचून पाणवतील डोळे

रात्री कुटुंबीयांसोबत शेवटचं जेवला अन् सकाळी आढळला मृतावस्थेत; वहीत लिहिलेली व्यथा वाचून पाणवतील डोळे

Suicide in Aaurangabad: औरंगाबाद येथील एका दहावीतील विद्यार्थ्यानं मनाला चटका लावणारी व्यथा लिहून आपल्या आयुष्याचा शेवट (10th grade student suicide) केला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 11 ऑक्टोबर: आईने अभ्यास करण्याची सक्ती केल्याने काल कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे एका अल्पवयीन मुलीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Minor female student commits suicide) केली होती. ही घटना ताजी असताना, आता औरंगाबाद येथील एका दहावीतील विद्यार्थ्यानं मनाला चटका लावणारी व्यथा लिहून आपल्या आयुष्याचा शेवट (10th grade student suicide) केला आहे. अशा किरकोळ कारणातून मुलानं टोकाचं पाऊल उचलल्याने आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

निखिल सुनील लोळगे असं आत्महत्या करणाऱ्या 16 वर्षीय मुलाचं नाव आहे. निखिलनं शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या वहीत एक भावनिक पत्र लिहून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत निखिल हा औरंगाबादच्या सिडको परिसरातील एन-9 येथील रहिवासी होता. तो इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून त्याचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. तर त्याची आई गृहीणी आहे. त्याला एक लहान भाऊ देखील आहे.

हेही वाचा-सांगली: 5 वर्षांपूर्वी दोस्तीत आलं वैर; डोक्यात दगडी पाटा घालूनच मैत्रीचा शेवट

गेल्या दीड दोन वर्षांपासून शिक्षणात खंड पडला आहे. दरम्यान ऑनलाइन क्लास करत शिक्षण घेतलं. पण ऑनलाइन शिकवलेलं फारसं समजत नाही. तसेच पाठांतर केलं तर लक्षात राहत नाही. या कारणातून त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं आपली व्यथा एका वहीत लिहून ठेवली आहे. त्याने वहीत लिहिलं की, 'माझं दहावीचं वर्ष आहे. मात्र मला अभ्यास समजत नाहीये, पाठांतर केलेलं लक्षात राहात नाही. यामुळे प्रत्येकजण मला बोलतात. मित्रही हसतात...' अशा आशयचा मजकूर लिहून त्यानं आत्महत्या केली आहे.

हेही वाचा-रोज-रोज सेक्स करण्यासाठी पत्नीचा नकार; भडकलेल्या पतीच्या कृत्याने यवतमाळ हादरलं!

नेमकं काय घडलं?

मृत निखिलने शुक्रवारी दिवसभर ऑनलाइन क्लास केला होता. क्लासनंतर अभ्यास करून त्याने रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केलं. त्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. शनिवारी सकाळी नऊ वाजले तरी निखिल खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे निखिलची आई त्याला उठवण्यासाठी रुमकडे गेली. पण निखिल त्याच्या खोलीत आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला. खोलीतील चित्र पाहून आईला काय करावं काहीच सुचलं नाही. तिने आरडाओरडा करत घरातील सदस्यांना आणि शेजाऱ्यांना बोलवलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निखिलचा मृतदेह खाली उतरवून घाटी रुग्णालयात नेलं. मात्र याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: October 11, 2021, 8:06 AM IST

ताज्या बातम्या