औरंगाबाद, 02 नोव्हेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर याठिकाणी अत्याचाराच्या परिसीमा गाठणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी आणि त्याच्या मित्राने बलात्कार (step father and his friend raped minor girl) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या एक महिन्यांपासून नराधम आरोपी पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होते. विशेष म्हणजे या कुकृत्याला जन्मदात्या आईनं कोणताही विरोध केला नाही. याउलट अल्पवयीन मुलीला अत्याचाराकरीता प्रवृत्त करण्याची भूमिका बजावली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर, वैजापूर पोलिसांनी आरोपी सावत्र बाप, त्याचा मित्र आणि जन्मदात्या आईविरोधात बाल लैंगिक प्रतिबंधक कलमासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सावत्र वडील राजू लक्ष्मण सोळसे, सतीश कनगरे आणि पीडित मुलीची आई अशी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 14 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराची करूण कहाणी ऐकल्यानंतर पोलीसही हादरून गेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. पण या गुन्ह्यातील आरोपी मित्र आणि पीडितेची आई फरार आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा- दोस्तीत कुस्ती! लग्नाला 15 दिवस बाकी असताना मित्राच्या GF ला घेऊन ठोकली धूम नेमकी घटना काय आहे? 14 वर्षीय पीडित मुलगी औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी वसतिगृहात वास्तव्याला असते. पण अलीकडेच तिच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या एक वर्षांपासून पीडित मुलगी आपल्या आई वडिलांकडे राहत होती. दरम्यान तिच्या सावत्र पित्याने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. यामध्ये सावत्र बापाचा अन्य एक मित्र देखील सहभागी झाला. विशेष म्हणजे पीडित मुलीच्या जन्मदात्या आईच्या संमतीने नराधम आरोपी पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार करत होते. हेही वाचा- पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3महिने विकृत कृत्य; रोज छतावर घेऊन जायचा अन् गेल्या एक वर्षांपासून अल्पवयीन मुलीसोबत हा भयावह प्रकार सुरू होता. दरम्यान पीडित मुलीने अनेकदा तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला. पण नराधम आरोपींनी आणि तिच्या आईने पीडित मुलीच्या गुप्तांगात मिरची टाकण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. यानंतर अखेर पीडित मुलीने संबंधित सर्व प्रकार आपल्या मावशीला सांगितला. मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती मिळताच, मावशीने पीडितेला वैजापूर पोलीस ठाण्यात घेऊन जात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीविरोधात पोक्सोसह गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.