मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

Aurangabad: कोरोना बाधित मोकाट अन् बोगस रुग्णावर होतायत उपचार, औरंगाबादमध्ये 10 हजारात मिळतायत डमी रुग्ण

Aurangabad: कोरोना बाधित मोकाट अन् बोगस रुग्णावर होतायत उपचार, औरंगाबादमध्ये 10 हजारात मिळतायत डमी रुग्ण

औरंगाबादमध्ये कोरोना बाधित मोकाट अन् बोगस रुग्णावर होतायत उपचार; 10 हजार रुपयांत होतेय डील

औरंगाबादमध्ये कोरोना बाधित मोकाट अन् बोगस रुग्णावर होतायत उपचार; 10 हजार रुपयांत होतेय डील

Aurangabad News: औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क बोगस कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून कोविड बाधित रुग्ण मोकाट फिरत असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद, 17 नोव्हेंबर : बोगस डॉक्टर्सला पकडल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल पण आता औरंगाबाद (Aurangabad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथ कोविड सेंटरमध्ये चक्क बोगस रुग्णांवर (bogus covid patient) उपचार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Covid positive) मोकाट फिरत असून त्यांच्याऐवजी बोगस रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय.

बोगस कोरोना बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी 10 हजार रुपये दिले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बोगस रुग्ण, तसेच पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादमधील एका उद्यानाच्या बाहेर कोरोनाची अँटीजेन टेस्ट केली असताना दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं कळालं. यानंतर या दोन्ही तरुणांनी आपल्या ऐवजी इतर दोन तरुणांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले.

वाचा : निलंबनाच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

ज्यावेळी या तरुणांच्या लक्षात आले की, आपल्याला कोविड रुग्ण म्हणून दाखल करुन उपचार सुरू केले आहेत त्यावेळी त्यांचाही गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घालत सुटका करण्याची मागणी केली. यानंतर रुग्णालय प्रशासनाच्याही हा प्रकार लक्षात आला.

त्यानंतर संबंधित दोन्ही तरुणांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल होण्यासाठी आपल्याला 10 दिवसांसाठी 10 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. बोगस रुग्णांच्या विरोधात तक्रार दाखळ करण्यात आली आहे. मात्र, खरोखर जे रुग्ण कोविड बाधित आहेत ते मात्र, अद्याप फरार आहेत.

वाचा : लग्न अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, पित्याचं टोकाचं पाऊल

या संपूर्ण प्रकरणी औरंगाबाद महानगरपालिकेकडून रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल खऱण्यात आली आहे. आता खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात कोविड बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घसरण होत आहे. तसेच लसीकरणाचा वेगही जोरात असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. अनेक नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत तर बहुतांश नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून दुसरा डोस घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोनाचा विळखा सैल होत असताना सर्व व्यवहार, सेवा, शाळा-महाविद्यालये, मंदिरे, मॉल्स सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्याच दरम्यान औरंगाबादमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Aurangabad, Coronavirus, Covid cases