कल्याण, 28 एप्रिल: 4 वर्षांपूर्वी मुंबईजवळच्या कल्याण येथील आधारवाडी तुरुंगाची (Adharwadi Jail kalyan) उंच भिंत ओलांडून धूम ठोकणाऱ्या एका सराईत दरोडेखोराला मुंबई पोलिसांनी नुकतीचं अटक (robber arrested by police Mumbai) केली आहे. गेल्या चार वर्षांपासून मुंबई पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेते होते. पण त्याने दरम्यानच्या काळात अनेकदा मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने ही मोठी कारवाई केली असून मुंबईतील उलवे भागातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 27 वर्षीय आरोपीचं नाव डेव्हिड मुर्गेश देवेंद्र असून त्याने आतापर्यंत महाराष्ट्रासोबतचं इतर राज्यातही अनेक ठिकाणी दरोडे, घरफोड्या, आणि जबरी चोऱ्या केल्या आहेत. अशाच एका गुन्ह्यात अटक केली असता, त्याने 2017 साली कल्याण येथील आधारवाडी तुरुंगाची उंच भिंत वायरच्या साह्याने ओलांडली होती. पलायन करतानाची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली होती. त्यामुळे तुरुंग प्रशासनाची मोठी नाच्चकी झाली होती. अनेकांनी तुरुंग प्रशासनाच्या कारभारावार टीका केली होती. दैनिक पुढारी नं दिलेल्या वृत्तानुसार, 2017 साली आरोपी डेव्हिड मुर्गेश देवेंद्र याने आपला साथीदार मनीकंडर नाडर याच्यासोबत अत्यंत शिताफीने पळून गेले होते. तुरुंगातून सुटका होताच त्यांनी थेट कन्याकुमारी गाठली होती. याठिकाणीही त्यांनी आपली गुन्हेगारी सुरू ठेवली. दरम्यानच्या काळात दोघांनी कन्याकुमारीमध्ये अनेक ठिकाणी चोरी, दरोडे आणि घरफोड्या सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तेथील पोलिसांनी डेव्हिडला अटक केल्यानंतर त्याने कन्याकुमारी पोलिसांच्या हातावर देखील तुरी दिल्या. यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रात आला. हे ही वाचा- पुण्यातील दागिने पॉलिश करणाऱ्या व्यावसायिकाला कारागिराने घातला 36 लाखांचा गंडा दरम्यानच्या काळात आरोपी डेव्हिड हा एका पाणी विक्रेत्याकडे काम करू लागला. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाताचं, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंगळवारी रात्री त्याला खडपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. घटनेची पुढील कार्यवाही मुंबई पोलिस करत आहे. आरोपी डेव्हिडनं महाराष्ट्रात 15 आणि तामिळनाडूत 11 पेक्षा जास्त जबरी गुन्हे केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.