औरंगाबाद, 12 जुलै : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे (Pooja Chavan suicide case) शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. मात्र ते लवकरच परतणार असल्याचं सूचक वक्तव्य शिवसेना मंत्र्यांनी केलं होतं. दरम्यान आज संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
यावेळी ते म्हणाले की, मी सध्या राज्यभर दौरा करणार आहे. तांड्यांवर-वाडीवर राहणाऱ्या माझ्या समाजाला भेटणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. आणि शेवटी मुख्यमंत्री यांना भेटून समाजाची बाजू मांडणार. माझा राजीनामा (sanjay rathod resign) घेण्यात आला नाही तर मी स्वतः राजीनामा दिला होता. कारण असे आरोप झाल्यावर वेगळे होणे गरजेचे होतं. माझे नेते उद्धव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी महत्वाचा आहे. सध्या त्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. दोषी आढळले तर मी बाहेर जाईन. मात्र निर्दोष सिद्ध झालो तर माझ्याबद्दल काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी भूमिका माजी मंत्री संजय राठोड यांनी मांडली. (Sanjay Rathore addressed the press conference)
त्यामुळे सध्या समाजातील लोकांनी भेट घेण्याचा प्लान संजय राठोड य़ांनी आखला आहे. यापुढे काय होणार, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असं राठोड यावेळी म्हणाले.
हे ही वाचा-मुख्यमंत्र्यांवरच आरोप, शिवसेनेचे नेतेही नाना पटोलेंवर भडकले, म्हणाले...
काय म्हणाले होते उदय सामंत
संजय राठोड (Sanjay Rathore) यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पण, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं होतं. संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असं उदय सामंत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pooja Chavan, Sanjay rathod, Sanjay rathod resign, Shivsena