मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /BIG BREAKING: अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद

BIG BREAKING: अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद

Raj Thackeray Aurangabad Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray Aurangabad Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray Aurangabad Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद, 3 मे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेला (Aurangabad Rally) पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडे आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलम 116, 117 आणि 153 अ, भादवि 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद पोलिसांनी सभेला परवानगी देताना ज्या अटी-शर्थी घातल्या होत्या त्यांचं उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात बैठक

थोड्याच वेळापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) यांच्यात दुपारी एक बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिला.

काय म्हणाले होते पोलीस महासंचालक?

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तानी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील.

आवश्यक वाटल्यास राज ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Maharashtra News, MNS, Raj Thackeray