Home /News /aurangabad /

Lockdown :1 जूननंतर औरंगाबादेत दुकानं उघडणार म्हणजे उघडणारच, खासदार जलील यांचा इशारा

Lockdown :1 जूननंतर औरंगाबादेत दुकानं उघडणार म्हणजे उघडणारच, खासदार जलील यांचा इशारा

Imtiaz Jalees say No to lockdown सरकार लॉकडाऊन लावायचं म्हटलं तर लोकप्रतिनिधीही मान डोलावतात. पण सरकारच्या विरोधात कुणाला तरी बोलावं लागेल. दुर्दैव हेच आहे की कोणी बोलत नाही पण मी बोलणार मी विरोध करणार, त्यामुळं एक तारखेसाठी आम्ही निर्णय घेतला आहे असंही जलील म्हणाले.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद, 25 मे : सरकारनं राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) किंवा निर्बंध वाढवले तरी 1 तारखेला औरंगाबादमधील (Aurangabad) दुकानं सुरू करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे. लोक आत्महत्या (Suicide) करत आहेत. सरकारनं त्यांच्या अडचणी दूर कराव्यात, केवळ टिव्हीवर येऊन ज्ञान दिल्याने लोक ऐकणार नाही. लॉकडाऊन लावायचंच असेल तर लोकांच्या अडचणी आधी सोडवा, असं जलील यांनी म्हटलं आहे. तसं केलं नाही तर आम्ही दुकाने उघडणार सरकारनं काय करायचं ते करून घ्यावं, असं जाहीर आव्हानाच जलील यांनी दिलं. (Imtiaz Jalee says No Lockdown in Aurangabad) (वाचा-मोठ्या आवाजात गाणं लावल्यानं झाला वाद; भांडणात तरुणानं चौघांना घेतला चावा) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जलील म्हणाले की टिव्ही येऊन जर तुम्ही केवळ ज्ञान देणार असाल तर कोणी ऐकेॉणार नाही. तुम्ही राज्यासाठी तुम्हाला हवा असेल तो निर्णय घ्या. मात्र, औरंगाबादसाठी आम्ही आमचा निर्णय घेणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला. जलील यांनी यावेळी सरकारला सल्लाही दिला. सरकार आमचं म्हणणं ऐकत असेल तर आम्हीही लॉकडाऊनला पाठिंबा देऊ. तुम्ही लॉकडाऊनच्या काळातील लोकांचे वीज बिल माफ करा, बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबवा आणि व्याज माफ करा. लोकांकडून कोणताही कर घेणार नाही अशी टीव्हीवर घोषणा करा. तसं केल्यास आम्हीबी समर्थन देऊन. तसं नसेल तर एक तारखेपासून औरंगाबाद उघडणार म्हणजे उघडणार अस जलील यांनी स्पष्टपणे सांगितलं. (वाचा-कोरोनाबाधित बाळासाठी आईनं केलं जीवाचं रान; PPE किट घालून कोविड वॉर्डात ठोकला मुक) जलील यांनी यावेळी म्हटले की, औरंगाबादमध्ये एका रिक्षावाल्याने आत्महत्या केली आहे. गाडीसाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी लोक घरी चकरा मारतात. अशाप्रकारे कर्जाच्या हप्त्याची वसुली करू नये याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असं आवाहनही जलील यांनी केलं आहे. सरकार लॉकडाऊन लावायचं म्हटलं तर लोकप्रतिनिधीही मान डोलावतात. पण सरकारच्या विरोधात कुणाला तरी बोलावं लागेल. दुर्दैव हेच आहे की कोणी बोलत नाही पण मी बोलणार मी विरोध करणार, त्यामुळं एक तारखेसाठी आम्ही निर्णय घेतला आहे असंही जलील म्हणाले. राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सरकार संपूर्ण निर्बंध उठवणार नसून क्रमाक्रमानं अनलॉक करणार असंही म्हटलं जात आहे. मात्र नेमकी माहिती अद्याप समोर नाही. कोरोनाच्या संपूर्ण स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण आता लॉकडाऊनला अशाप्रकारे विरोध सुरू झाल्यानं संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad News, Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या