Home /News /aurangabad /

Aurangabad Crime: मोठ्या आवाजात गाणं लावल्यानं झाला वाद; भांडणात तरुणानं चौघांना घेतला चावा

Aurangabad Crime: मोठ्या आवाजात गाणं लावल्यानं झाला वाद; भांडणात तरुणानं चौघांना घेतला चावा

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एका तरुणानं चार जणांना जबरी चावा (man bite four neighbours) घेतल्याची घटना घडली आहे. टेपवर गाणं वाजण्यावरून झालेल्या वादानंतर (hassle over playing songs) एकाने शेजारी राहणाऱ्या चार जणांना चावा घेतला आहे.

पुढे वाचा ...
    वाळूज, 25 मे: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एका तरुणानं चार जणांना जबरी चावा (man bite four neighbours) घेतल्याची घटना घडली आहे. टेपवर मोठ्या आवाजानं गाणं वाजण्यावरून झालेल्या वादावादीनंतर (hassle over playing songs) आरोपी तरुणानं शेजारी राहणाऱ्या चार जणांना चावा घेतला आहे. संबंधित घटना रविवारी सायंकाळी साजापूर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीनं वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास वाळूज पोलीस करत आहेत. संबंधित 32 वर्षीय फिर्यादीचं नाव प्रमोद विश्वनाथ इच्छे असून तो साजापूर याठिकाणी राहतो. फिर्यादीनं शनिवारी आपल्या घरातील टेपवर मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यामुळे घराशेजारी राहणारा आरोपी शेख अन्वर यानं फिर्यादीला रविवारी सायंकाळी 'तू शनिवारी मोठ्या आवाजात गाणी का लावली होती?' असा जाब विचारला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी फिर्यादी प्रमोद इच्छे आरोपी शेख अन्वरला समजावून सांगण्याचा  प्रयत्न करत होता. पण काहीच वेळात या वादावादीचं हाणामारीत रुपांतर झालं. यावेळी संतापलेल्या अन्वरने प्रमोदाला मारहाण करायला सुरूवात केली आणि डाव्या करंगळीला चावा घेतला. नवऱ्याला होणारी मारहाण पाहून प्रमोद याची पत्नी कोमल भांडणं सोडवण्यासाठी मध्ये पडली. यानंतर अन्वरची पत्नी आणि त्यांचा मुलगाही या भांडणात उतरले. या तिघांनी मिळून इच्छे दाम्पत्याला मारहाण केली. दरम्यान कोमल खाली पडल्या असताना अन्वरने तिच्या मांडीला चावा घेतला. हा तुंबळ हाणामारीचा प्रसंग पाहून शेजारी वास्तव्यास असणारे नवनाथ कीर्तीकर आणि त्यांची पत्नी सीमा कीर्तीकर हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आले. हे ही वाचा-पत्नीची हत्या करुन रचला अपघाताचा बनाव, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल यावेळी आरोपी अन्वरने भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या नवनाथ यांच्या पाठीला तसेच सीमा यांच्या उजव्या भुवईला चावा घेतला. दैनिक लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, या मारहाणीनंतर आरोपी अन्वरने फिर्यादी प्रमोद यांच्या अ‍ॅपेरिक्षावर वीट फेकून मारली. ज्यामध्ये रिक्षाची काच फुटली आहे. या घटनेनंतर प्रमोद ईच्छे यांनं एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून वाळूज पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime

    पुढील बातम्या