घरगुती उपचाराने घेतला चिमुरड्याचा जीव, करंट लागला म्हणून वाळूखाली पुरून ठेवलं

घरगुती उपचाराने घेतला चिमुरड्याचा जीव, करंट लागला म्हणून वाळूखाली पुरून ठेवलं

मुलाला अत्यंत जोराचा शॉक बसला होता. त्यामुळं त्याला लगेचच रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. मात्र त्याऐवजी कुटुंबीयांनी त्याच्यावर भलतेच घरगुती उपचार सुरू केले.

  • Share this:

बरेली, 11 जून : अनेकदा लहान-सहान अपघात, दुर्घटना किंवा आजारांसाठी आपण घरगुती उपाय करत असतो. पण गंभीर बाबतीच तसा धोका पत्करणं हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) नुकताच याचा प्रत्यय आला. याठिकाणी एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला करंट (Electric Shock) लागला होता. पण या अपघातानंतर त्याला रुग्णालयात लगेच न नेता त्याच्यावर घरगुती उपचार करण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला.

(वाचा-महाराष्ट्राने कोरोनाचे मृत्यू लपवले? आरोग्य विभागाने दिलं 'हे' स्पष्टीकरण)

उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील शिशगड परिसरामध्ये ही दुर्घटना घडली. याठिकाणी ई रिक्षा चालवणारे रिक्षा चालक भूपेंद्र यांची रिक्षा घराबाहेर चार्ज होत होती. त्याचवेळी त्यांचा मुलगा करण हा त्याठिकाणी आला. त्यावेळी मोकळ्या तारेशी त्याचा संपर्क आला आणि त्याला करंट लागला. यामुळं एकच आरडा ओरडा सुरू झाला. मुलाला अत्यंत जोराचा शॉक बसला होता. त्यामुळं त्याला लगेचच रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. मात्र त्याऐवजी कुटुंबीयांनी त्याच्यावर भलतेच घरगुती उपचार सुरू केले.

(वाचा-'सबका बदला लेगा रे तेरा व्हाइट वॉकर', अश्विनच्या प्रश्नाला जाफरचं भन्नाट उत्तर)

मुलाला रुग्णालयात नेण्याऐवजी कुणीतरी सांगितल्यानुसार वाळूखाली पुरून ठेवण्यात आलं. जवळपास एक तास या मुलाला तसंच ठेवण्यात आलं. या दरम्यान मुलाला प्रचंड त्रास होत होता. पण तरीही त्याला तसंच ठेवण्यात आलं. त्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही, तर त्याला रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

मुलाला कुठल्या तरी नातेवाईकाच्या सांगण्यानुसार वाळूखाली ठेवण्याऐवजी जर वेळीच रुग्णालयात नेलं असतं तर त्याचे प्राण वाचवण्यात यश आलं असतं. सुमारे तासभर त्याला तसंच ठेवण्यात आलं. त्यामुळं रुग्णालयात पोहोचण्याआधी रस्त्यातच त्यानं अंतिम श्वास घेतला. त्यामुळं घरगुती उपचाराचा चुकीच्या ठिकाणी चुकीचा वापर केल्यानं या कुटुंबाला चिमुरड्याला गमवावं लागलं.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 6:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या