जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / झोपलेल्या पतीला फरपटत नेऊन पत्नीसमोरच चिरला गळा, औरंगाबादेतील घटना

झोपलेल्या पतीला फरपटत नेऊन पत्नीसमोरच चिरला गळा, औरंगाबादेतील घटना

ही घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.

ही घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.

ही घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 07 मे : औरंगाबाद (aurangabad) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले आणि धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक औरंगाबादमधील दौलताबाद पोलीस स्टेशनच्या (daulatabad police station ) हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. कैलास बीआनसिंग मिंगवाल असे हत्या झालेल्या मजुरांचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला. हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. ( विश्वविजेत्या गोलंदाजाने वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे टोचले कान, म्हणाला.. ) कैलास हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील असून काही महिन्यांपूर्वी तो रोजगारासाठी पत्नी मुलांसह औरंगाबादेतील करोडी शिवारात आला होता. तेथे तो गट क्रमांक-१११ मध्ये शेतात कामाला होता. शेताजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तो पत्नीसह राहत होता.  मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने झोपलेल्या अवस्थेतच कैलास ला फरपटत बाहेर नेले. त्यानंतर धारदार हत्याऱ्याने पत्नीसमोरच कैलासच्या गळ्यावर तीन ते चार वार करून हत्या केला. त्यानंतर लगेच अंधाराचा फायदा घेत पसार झाला. ( पती-पत्नीचा रात्रीच्या अंधारात काळा धंदा, अखेर मुंबई पोलिसांनी नांग्या ठेचल्या ) या घटनेनंतर पत्नीने आरडाओरडा करून इतर लोकांना उठवलं. त्यानंतर वस्तीतील लोक मदतीला धावून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृत कैलासचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात