औरंगाबाद, 05 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery aurangabad sabha 2022) यांच्या औरंगाबाद येथील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाच्या पोलिसांच्या (aurangabad police) तपासाला वेग आला आहे. सभेत केलेल्या वक्तव्याचे पुरावे जमा करण्यात आले आहे. लवकरच साक्षीदारांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर औरंगाबदमध्ये 1 मे रोजी झालेल्या सभेबाबत गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरी यांनी तपास सुरू केला आहे.
('13 साथ' अन् 13 दिवसांनी भेट, नवनीत राणा आणि रवी राणांचा भावुक क्षण, PHOTOS)
पोलिसांनी सभा स्थळाचा पंचनामा केला आहे. सभेच्या भाषणाचे पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत. साक्षीदारांचा जबाब उद्या शुक्रवारी नोंदवले जाणार आहे. राज ठाकरे यांना या प्रकरणी लगेच नोटीस द्यायची का नंतर द्यायची हा तपासी अधिकाऱ्याचा तपासावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.
दोन दिवसानंतर पुण्याचे शिलेदार अवतरले
दरम्यान, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह सगळेच प्रमुख नेते हे आंदोलनाच्या दिवशी नॉट रिचेबल होते. त्यांच्यावरून मोठी टीका होत होत.. या सर्व प्रकारावर आता साईनाथ बाबर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांचा प्रचंड दबावामुळे आम्ही बाहेर पडू शकलो नसल्याचं ते म्हणाले.
(ऋतुजा बागवे प्लॉन्ट करताना दिसली परकर-पोलकं, हेमांगी कवीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!)
तसंच वसंत मोरे हे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे तिरुपती बालाजी येथे गेले होते. त्याची पूर्वकल्पना ही त्यांनी या आधीच दिली होती. मनसेच्या आंदोलनाचा परिणाम दिसून येतो आहे. पहाटेची अजान आता भोंग्यावर होत नसल्याचे दिसून येत आहे. तर दुपारच्या अजानसाठी ठरवून दिलेल्या डेसीबलमध्ये आवाजाची मर्यादा असल्याचे देखील दिसून आले आहे.. त्यामुळे मनसेने जे काही आंदोलन छेडलं होतं यशस्वी झाले आहे, असा दावा बाबर यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.